आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हॉटेल एक्सप्रेस इन जवळील सर्व्हिसरोडवर जीपने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत विलास नितनवरे (वय 22, रा. श्रीगोंदा) तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पांडवलेणीजवळ मुस्ताक सय्यद यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनसाखळी लांबवली : भाभानगर येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी 45 हजार रुपयांची सोनसाखळी लांबवली. या प्रकरणी कुसुम देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा चोरट्यांना अटक : सातपूरच्या अँक्सलो कंपनीच्या आवारातून 12 हजाराच्या साहित्य चोरीप्रकरणी संजय आढाव व अंकुश मोरे (रा. स्वारबाबानगर) यांना अटक करण्यात आली. करणसिंग बहाद्दर यांच्या फियादीवरून सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.