आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक हब' अॅप ठरणार मार्गदर्शक,राहुल रायकर यांनी तयार केले अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी माइन्डट्रिक्स सॉफ्टवेअरचे संचालक राहुल रायकर यांच्या मार्गदर्शनाने ‘नाशिक हब' नावाचे एक हायटेक मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनमध्ये कुंभमेळ्याच्या इतिहासासह नाशिकमधील सोयी-सुविधांची माहिती देण्यात आली आहे. मिरवणूक मार्ग, नाशिक कुंभमेळा वेळापत्रक, मिसिंग रिपोर्ट, रुग्णालये, फार्मासिस्ट, पेट्रोलपंप, एटीएम, बँका, हॉटेल्स, लाॅजिंग, बस वेळापत्रक, बसचे मार्ग, इमर्जन्सी नंबर्स, पोलिस ठाणी, रेल्वे वेळापत्रक, प्रतिनिधी आदींची सविस्तर माहिती नकाशांसह देण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक नाशिकला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने येणा-या भाविकांचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसह स्थानिक यंत्रणांवर आहे. भाविकांच्या नियोजनासाठी, त्यांना नियंत्रित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रशासन स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. यादृष्टीने माइन्डट्रिक्स सॉफ्टवेअरने लाखो भाविकांना उपयुक्त ठरेल, असे स्वतंत्र मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे एका क्लिकवर ‘नाशिक हब’मध्ये वरील सर्व प्रकारची अन्य पूरक माहिती उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ मेळ्याच्या यशस्वीतेसाठी एकीकडे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहेच, त्याचबरोबर या अॅप्लिकेशनमुळे कुंभमेळ्याशी संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नवीन पिढीला ही माहिती निश्चितच उपयोगी पडणार आहे, असा विश्वास ‘नाशिक हब’च्या टीमने व्यक्त केला.

लुटमारीपासून संरक्षण
माहितीवा पत्ता विचारणा-या लोकांना गंडविले जाते. भाविकांनी मोबाइलवर ‘नाशिक हब' अॅप डाउनलोड केल्यास त्यांना माहिती विचारण्याची गरज उरणार नाही लुटमारीला आळा बसू शकेल. राहुलरायकर, संचालक, ‘माइन्डट्रिक्स’

..यांनी दिलेय योगदान
‘नाशिकहब' अॅप बनवण्यात अमोल सनान्से, मुकेश राणे, मेघा साबणे, ज्योती पोरजे, संतोष साळी या संपूर्ण टीमने योगदान दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...