आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बोगदा सुरू करण्यासाठी शिवसेनेचे अांदाेलन, ‘अाप’चीही घाेषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने शुक्रवारी सायंकाळी मेणबत्ती आंदोलन केले. याचप्रमाणे अाम अादमी पार्टीनेही या ठिकाणी अांदाेलन केले. हे आंदोलन दडपण्याचा इंदिरानगर पोलिसांनी प्रयत्न केला. वरिष्ठ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने या आंदोलनाची खिल्ली उडविल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख संजय गायकर यांच्या अध्यक्षतेखाली मेणबत्ती आंदोलन झाले. यावेळी दौलत भामरे, हर्षल गोखले, अतुल कुलकर्णी, सुयोग गाडे, योगेश पवार, तुषार दायमा, संतोष कहाणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी आंदोलकांची समजूत काढीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तर, ‘अाप’तर्फे करण्यात अालेल्या अांदाेलनप्रसंगी घोषणा देण्यात अाल्या. बोगदा सुरू झाल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. ‘अाप’चे जितेंद्र भावे, जसबीरसिंग, स्वप्नील घिया, राजू आचार्य, पद्माकर आहिरे, अक्षय अहिरे, पंकज जोशी, प्रमोदिनी चव्हाण, प्रियंका अहिरे, सचिन पटले, संजय तांबे पदाधिकारी सहभागी हाेते.

‘अाप’तर्फे करण्यात आलेल्या अांदाेलनात सहभागी जितेंद्र भावे, जसबीरसिंग, स्वप्नील घिया, राजू आचार्य, पद्माकर आहिरे, अक्षय अहिरे, पंकज जोशी, प्रमोदिनी चव्हाण अादी.
मेणबत्ती आंदोलन करताना शिवसेनेचे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख संजय गायकर, दौलत भामरे, हर्षल गोखले, अतुल कुलकर्णी, सुयोग गाडे, योगेश पवार आदींसह नागरिक.

त्या निरीक्षकाचे अामदारांकडे बाेट
निरीक्षक सावंत यांचा उपनगर ठाण्यातील कार्यकाळ वादग्रस्त असून, त्यांना तत्कालीन अायुक्त सरंगल यांनी निलंबित केले हाेते. याच सावंत यांनी अांदाेलकांना, ‘पेालिसांविराेधात अांदाेलन काय करतात, यामागे पालिका अायुक्त, अामदार अाणि महामार्ग प्राधिकरण असून, त्यांच्याविराेधात अांदाेलन करा’, असा सल्ला दिला.

पाेलिस निरीक्षकाकडून खिल्ली
मेणबत्ती अांदाेलन सुरू होताच वरिष्ठ निरीक्षक हेमंत सावंत यांनी दडपशाही करीत आंदोलकांना फैलावर घेतले. संजय गायकर यांच्याशी बोलत, ‘मेणबत्ती आंदोलन कुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी केले का? तुम्ही अामच्याकडे या, अांदाेलनासाठी तुम्हाला चांगले विषय देतो,’ असे म्हणत त्यांनी या अांदाेलनाची खिल्ली उडवली.

याचिका दाखल करणार
^हारस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी आम्ही विनंती करूनही प्रशासन दखल घेत नाही. यामुळे आम्ही आता सोमवारी न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणार आहोत. त्यात आम्हाला न्याय मिळेल, ही अपेक्षा आहे. संजय गायकर, शिवसेना मध्य नाशिक विधानसभा प्रमुख
बातम्या आणखी आहेत...