आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक: शहरातील आजारी उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी या क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असलेली माइंडस्प्रिंग अँडव्हायजरी कंपनीची मदत होणार आहे. नाशिक इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनसमवेत (निमा) कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. निमा हाऊस येथे याबाबत एक बैठकही झाली.
जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्या पातळीवर उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शहरातील उद्योजकांना मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. विदेशातील उद्योगांच्या सहकार्याने ही माहिती स्थानिक उद्योजकांना उपलब्ध करून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी मदत करण्यात येणार आहे.
काही उद्योगांचे उत्पादन चांगले आहे, बाजारपेठही उपलब्ध आहे; मात्र आर्थिक मंदीमुळे व तांत्रिक माहितीअभावी काही उद्योग आजारी असून, काही बंद पडले आहेत. अशा उद्योगांना पूर्व स्थितीत आणून त्यांचा विस्तार करीत जागतिक पातळीवर त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याने कंपनी यात भूमिका बजावू इच्छिते, असे माइंडस्प्रिंगचे प्रतिनिधी ऋषिकेश शिंत्रे यांनी सांगितले. शहरातील दातार स्विच गियरसह इतर पाच-सहा उद्योगांना मदत केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उद्योगांसाठी लवकरच निमा हाऊस येथे एक चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, मानद सरचिटणीस मनीष कोठारी, खजिनदार मंगेश पाटणकर, सचिव प्रकाश प्रधान, माजी अध्यक्ष नरेंद्र हिरावत, ऊर्जा उपसमितीचे अध्यक्ष मिलिंद चिंचोलीकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.