आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निमा’च्या अध्यक्षपदावर एकाही उमेदवाराने केला नाही दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा)करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (दि. १२) शेवटचा दिवस हाेता. विशेष म्हणजे, अध्यक्षपदावर एकाही उमेदवाराने दावा केलेला नाही. हे पद यावर्षी माेठ्या उद्याेग गटांच्या प्रतिनिधीकरिता राखीव अाहे. पदाधिकारी अाणि कार्यकारिणी सदस्यांच्या ४१ जागांकरिता ही निवडणूक हाेत असून, ८० उमेदवारी अर्जांची विक्री झाली हाेती, त्यापैकी ६६ अर्ज दाखल झाले अाहेत. २२ जुलै राेजी सायंकाळी वाजेपर्यंत माघारीची मुदत असून, निवडणुकीचे खरे चित्र याच दिवशी स्पष्ट हाेऊ शकणार अाहे.
२०१६-१८ या दाेन वर्षांकरिता निमाची निवडणूक हाेत अाहे. यात पहिल्या वर्षी अध्यक्षपद माेठ्या उद्याेगांच्या प्रतिनिधीकरिता राखीव असून, दुसऱ्या वर्षी लहान उद्याेगांच्या प्रतिनिधींकडे अध्यक्षपद असेल. खऱ्या अर्थाने माेठ्या उद्याेग गटाचा समावेश कार्यकारिणीत व्हावा, याकरिता अध्यक्षपदासह उपाध्यक्षाचे एक अशा दाेन पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अालेला नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत बाेलताना सांगितले. सत्ताधारी एकता पॅनलच्या इच्छुकांव्यतिरिक्त काही उमेदवारांनी वैयक्तिक अर्ज दाखल केले अाहेत. लहान उद्याेग गटाच्या उपाध्यक्षपदाकरिता विद्यमान सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी, तर हाॅनरेबल सेक्रेटरी पदाकरिता नितीन वाघस्कर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील उद्याेजकांची संघटना असलेल्या निमा संघटनेच्या निवडणुकीबाबत उद्याेग जगतात माेठी उत्सुकता अाहे. निमा सदस्य तसेच उद्याेग जगतात या निवडणुकीबाबत चर्चा सुरू अाहे. अध्यक्ष काेण हाेणार, यापासून ते निवडणूक अविराेध हाेणार का, याबाबत या सर्व संबंधितांमध्ये माेठी उत्सुकता अाहे. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी काेणी उमेदवारच पुढे अाल्याने त्याची माेठी चर्चा सुरू अाहे. यापुढे या निवडणुकीमध्ये अाणखी काेणत्या घडामाेडी घडतात, याकडे लक्ष लागले अाहे.

माहिती उशिरापर्यंत उपलब्ध नाही
सायंकाळी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत हाेती, त्यानंतर तासभर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उमेदवारी दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या नावांच्या यादीकरिता थांबून हाेते, मात्र उशिरापर्यंत अशी काेणतीच यादी उपलब्ध झाली नाही.

निवडणूक समितीची पाठ
नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या उद्याेजकांच्या या संघटनेच्या निवडणुकीकरिता ज्येष्ठ उद्याेजक व्ही. के. भुतानी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात अाली असून, त्यांना मदत करण्यासाठी उद्याेजक विवेक गाेगटे अाणि जे. एम. पवार यांचीही नेमणूक केली गेली अाहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाही या तिघांचीही या ठिकाणी अनुपस्थिती उपस्थितांना खटकणारी अाणि निमा उद्याेजक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
बातम्या आणखी आहेत...