आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Industries And Manufacturers Association Election Issue

'निमा'ची द्विवार्षिक निवडणूक आता अटळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (निमा) द्विवार्षिक निवडणूक आता अटळ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीच्या पूर्वसंध्येस एकता पॅनलच्या कोअर कमिटी बैठकीत अध्यक्षपदासाठी रवी वर्मा, उपाध्यक्षपदासाठी मंगेश पाटणकर व अन्य पदांसाठी संजीव नारंग, व्हीनस वाणी, समीर पटवा व ज्ञानेश्वर गोपाळे यांची नावे निश्चित करण्यात आली; मात्र याच पॅनलमधील अन्य इच्छुकांना सामावून न
घेतल्याने निवडणुकीची शक्यता वाढली आहे.

हॉटेल सुमनचंद्र येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, विजय तलवार, बी. पी. सोनार, विद्यमान अध्यक्ष मनीष कोठारी, संतोष मंडलेचा, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, अध्यक्ष विवेक पाटील यांचा समावेश असलेली कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीने उमेदवारांची नावे एकता पॅनलच्या वतीने निश्चित केली. दरम्यान, मंगळवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने दिवसभरातील घडामोडींना महत्त्व
आले आहे.

अविरोध निवडीचा मार्ग खुला
सहा जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून, कमिटीने एकता पॅनलच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. अविरोध निवडीचा मार्ग खुला आहे. - मधुकर ब्राह्मणकर

संस्थेच्या हिताला पोहोचेल बाधा
सोमवारच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती दिली गेली नाही. पॅनलचे नेते दीपक राठी यांच्याशीही संबंधितांनी चर्चा केलेली नाही. अशा पद्धतीने निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेतले गेले नाही. अशा गोष्टींमुळे संस्थेच्या हिताला बाधा पोहोचू शकते. - धनंजय बेळे, माजी अध्यक्ष