आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याेजकांनी प्रदूषणाबाबत कागदपत्रांची पूर्तता करावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्या पन्नास प्लेटिंग उद्याेगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने क्लाेजर नाेटीस पाठविल्या अाहेत, अशा उद्याेजकांनी लवकरात लवकर कायदेशीर तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. मात्र, यासाठी कुठेही, काेणालाही पैसे देऊ नका, असे अावाहन करतानाच ही पूर्तता केल्यावर केवळ शासकीय शुल्क भरून अाठ िदवसांत उद्योग सुरू हाेऊ शकतात, याकडे नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन( निमा)च्या बैठकीत लक्ष वेधण्यात अाले.
प्लेटिंग उद्याेजकांचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता निमा अाणि मेटल फिनिशर्स असाेसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस येथे रविवारी बैठक झाली. ‘निमा’चे उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, समीर पटवा, मेटल फिनिशर्स असाेसिएशनचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सेक्रेटरी विनायक गाेखले व्यासपीठावर हाेते.

उद्याेग बंद व्हावेत ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाची अपेक्षा नाही, मात्र न्यायालयीन बाबीत सातत्याने विचारणा हाेत असल्याने नाइलाजाने पन्नास प्लेटिंग उद्याेगांना क्लाेजर नाेटिसा महामंडळाने दिल्या अाहेत. ज्यांच्याकडे इटीपी नाहीत किंवा सांडपाणी निस्सारण व्यवस्था नाही, अावश्यक त्या तांत्रिक कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही, असे सर्वेक्षणात समाेर अाले त्यांना या नाेटिसा दिल्या गेल्या अाहेत. यात एमअायडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे काही उद्याेगांनी परवानगीसाठी अर्ज केलेले अाहेत, मात्र त्यावर कुठलेही उत्तर मिळालेले नाही, उलट त्यांनाही अशा नाेटिसा मिळाल्या अाहेत. हे उद्याेग बंद झाले तर किमान एक हजार लाेक बेराेजगार हाेणार असून, ‘निमा’कडून या प्रश्नावर कायदेशीर मार्गानेच ताेडगा काढला जाण्यावर भर दिला जात अाहे. याकरिता उद्याेजकांनी अावश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी ती फाइल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द करावी. तांत्रिक सहकार्यासाठी ‘निमा’ सर्वताेपरी सहकार्य करेल, असे अाश्वस्त करतानाच काेणीही पैसे मागत असेल तर देऊ नका, असे अावाहन पाटणकर यांनी यावेळी केले. याबाबत २० डिसेंबर राेजी पुन्हा एक बैठक अायाेजित करण्यात अाली अाहे. रविवारी झालेल्या उद्याेजकांच्या या बैठकीस ए. सी. मते, पंकज अग्रवाल, प्रदीप बाेरसे, चेतन पाटील, अजय इप्पर, सुभाष पाटील, नीलेश गवळी, देवेंद्र राणे अादी उपस्थित हाेते.

तर ही वेळच अाली नसती
गेल्या दहा वर्षांपासून अाम्ही एमअायडीसीकडे सीईटीपी प्रकल्पाकरिता भूखंडाची मागणी सातत्याने करीत हाेताे, मात्र २०१५ पर्यंत असा भूखंडच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात हाेते. मात्र, याच एमअायडीसीने २०१५ ला भूखंड उपलब्ध करून दिला. एमअायडीसीत जागा उपलब्ध नसतानाही हा भूखंड मिळाला, मात्र त्यापूर्वी उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले जात हाेते. त्याचवेळी हा भूखंड दिला गेला असता तर अाज उद्याेगांना बंद पडण्यापर्यंतची कारवाई हाेण्याची वेळच अाली नसती, याबाबत मेटल फिनिशर्स असाेसिएशनचे अध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी यावेळी खंत व्यक्त केली.

सीईटीपीला तत्त्वत: मान्यता
प्लेटिंग उद्याेगांचे सांडपाणी शुद्धीकरणासाठी प्रक्रियेसाठी सीईटीपी प्रकल्पाला तत्त्वत मान्यता मिळाली अाहे. ११ काेटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाकरिता जवळपास सात काेटी रुपये मेटल फिनिशर्स असाेसिएशनच्या सभासदांना उभारावे लागणार असल्याची माहिती यावेळी देण्यात अाली.

‘निमा’तर्फे अायाेजित करण्यात अालेल्या बैठकीस उपस्थित उद्याेजक
बातम्या आणखी आहेत...