आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik International Film Festival At Nashik Form 21 March

‘निफ’ फिल्म कार्निव्हल 21 मार्चपासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ मेट्रो फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या पुढाकाराने नाशिक येथे पाचवा नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘निफ फिल्म कार्निव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 21 ते 24 मार्च दरम्यान भरणार आहे. या महोत्सवाची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू आहे.

या महोत्सवात देश-विदेशातील लघुपट, माहितीपट, चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणा असून कलाकार, समीक्षक आदी मान्यवरांची यास उपस्थिती राहाणार आहे. महोत्सवासाठी महाराष्ट्र शासन, फिल्म डिव्हीजन ऑफ इंडिया, नॅशनल फिल्म अर्काइव्हज ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकपुर्ती वर्षानिमित्त या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘निफ फिल्म कार्निव्हल’ हे महोत्सवाचे विशेष आकर्षण राहाणार आहे. यात सुमारे 125 विविधरंगी विषयांच्या चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. जागतिक पातळीवरील उत्कृष्ट व पुरस्कार विजेत्या चित्रपटांबरोबरच फ्रेंच चित्रपट तसेच फिल्म डिव्हीजनतर्फे कला, संस्कृती व नाट्यावर आधारीत माहिती व लघुपट, फिचर फिल्म प्रिमियर, मालेगावातील मालीवूड सिनेका आदींची रेलचेल असेल.

जीवन गौरव पुरस्कार देणार : या चित्रपट महोत्सवांतर्गत चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व प्रतिभावंत कलाकारास त्याने चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल ‘जीवन गौरव’ पुरस्कार देवून गौरविण्यात येईल. तसेच उत्कृष्ट माहितीपटास पारितोषिक दिले जाणार आहे.

लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन
महोत्सवादरम्यान आंतरराष्ट्रीय लघुपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील सुप्रसिध्द कलाकार व चित्रपट दिग्दर्शक व निर्माता अँण्ड्रयू व्हेल यांचे मार्गदर्शन उद्योन्मुख तरूणांना लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटाच्या दिग्दर्शाकाचे मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार असल्याने त्याचा लाभ चित्रपट तसेच माहितीपट, लघुपट निर्मिती व दिग्दर्शन करू इच्छिणार्‍या नवोदीतांना होईल.