आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणकर्त्या अहिरेंची तब्येत खालावली; मेरीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाटबंधारे विभागात वाहनचालक पदामध्ये अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करून कर्मचार्‍यांच्याच मुलांना पदावर रुजू केल्याच्या निषेधार्थ 26 डिसेंबरपासून मेरीच्या कार्यालयासमोर बसलेल्या देवराव बुधा अहिरे यांची प्रकृती खालावली आहे. धरणग्रस्त व वाहनचालक पदाचा दावेदार असलेले सटाणा तालुक्यातील काकडगाव येथील आहेत.
मात्र, कुंटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच असल्याने त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन लहान मुलेही आहेत. पाच दिवसापासून अन्न आणि पाण्यावाचून असलेल्या अहिरेंची तब्येत खालावली असूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वाहनचालक पदासाठी परिक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये धरणग्रस्त म्हणून प्रबळ दावेदार असतांनाही अधिकार्‍यांच्या संगनमताने मला डावलून तेथे कर्मचार्‍यां मुलांना रुजु करण्यात आले. अन्याय झाल्याने त्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय यांच्याशीही पत्रव्यवहार केला असल्याचे अहिरे यांनी सांगितले आहे.
संपर्क क्रमांकांचे वावडे
स्वच्छ कारभार व नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी वीज कंपनी, पोलिस, रेल्वे, कृषी विभागातील अधिकार्‍यांचे भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात येतात. मात्र मेरी,सीडीओ व मेटामधील अधिकार्‍यांचे क्रमांक देण्यास तेथील कर्मचारी थेट नकार देत सर्वसामान्य नागरिकांना उद्धटपणाची वागणूक देतांना दिसतात.
अद्याप दखल नाही
मी पाच दिवसांपासून उपोषणास बसलो असून, सीडीओ मेरीचे कोणतेही अधिकारी पाहाण्यासाठी आलेले नाही. न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार आहे. माझे बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी ही अधिकार्‍यांचीच राहील.
-देवराम अहिरे, उपोषणकर्ता