आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik IT City Presentation Present In Hyderabad, Bangalore

हैदराबाद, बंगळुरात नाशिक आयटी सिटीचे सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - परराज्यातील उद्योगांनी गुंतवणूक करावी याकरीता महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून परराज्यांतील उद्योगांना मोहीनी घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दक्षीणेकडील हैद्राबाद आणि बंगलोर या दोन ‘आयटी सिटी’ ची त्याकरीता या शहरांची निवड करण्यात आली असून ऑगस्ट महिन्यात तेथे रोड शोचे आयोजन करण्यात आले असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले.


नाशिकच्या ब्रॅँडींगकरीता निमाच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ या दौ-यात सहभागी होणार आहे. यामुळे शहरात आयटी उद्योग येण्यास चालना मिळणार आहे.6 ऑगस्ट रोजी हैद्राबाद तर याच महिन्यात बंगलोरमध्ये हे रोड शो होणार आहेत. या दोन्ही शहरातील आयटी उदयोगांनी महाराष्टात गुंतवणूक करावी यासाठी एमआयडीसीकडे उपलब्ध सुविधा, शासनाचे उद्योगांकरीताच्या विविध सवलती आणि प्रोत्साहन योजना यांची माहीती या रोड शोव्दारे दिली जाणार आहे. एमआयडीसीची एक टिम या रोड शो मध्ये महाराष्‍ट्राचे सादरीकरण करणार आहे.