आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक आयटीआयचे प्रवेश सुरु; संगणक अभ्यासक्रमाला मुलींची अधिक मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी संगणक अभ्यासक्रमास (कोपा : कॉम्प्युटर ऑपरेटर कम प्रोग्रामिंग) मुलींचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, त्याखालोखाल हेअर अँड स्किन केअर या अभ्यासक्रमास मुली प्राधान्य देत आहेत.

संगणकाच्या वाढत्या गरजेमुळे विद्यार्थिनी संगणक अभ्यासक्रमास पसंती देत आहेत. हेअर अँँड स्किन केअर या अभ्यासक्रमासही महत्त्व दिले जात आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांना दहावी पास अशी पात्रता असल्याने दहावीनंतरच हे अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या विविध संधी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, सर्व्हरला तांत्रिक अडचणी आल्यामुळे 15 जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थिनींचा वाढता प्रतिसाद असला तरी अर्ज भरताना एक चूक बहुतांश विद्यार्थिनी करीत आहेत. अर्जावर बाहेरच्या विद्यार्थिनी नाशिक असा पर्याय निवडतात; मात्र तसे न करता आयटीआय हा पर्याय निवडावा. सातपूरच्या आयटीआयला तो अर्ज दाखल न होता मुलींच्या आयटीआयला दाखल होईल, असे आवाहन येथील पी. व्ही. पर्वतीकर यांनी केले आहे.

योग्य अर्ज भरावा
सध्या या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू असून, संस्थेच्या कार्यालयातच अर्ज भरण्याची सुविधा आहे. ही सुविधा सकाळी 8 ते 10 या वेळात उपलब्ध आहे. त्यामुळे चुका टाळण्याकरिता सायबर कॅफेमध्ये न जाता येथील मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखालीच अर्ज भरला जावा, असे आम्ही आवाहन करीत आहोत. -पी. व्ही. पर्वतीकर