आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनलक्ष्मी’त लॉकर्स वगळता व्यवहार ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनलक्ष्मी सहकारी बॅँकेच्या काही अधिका-यांनी आज कामकाज सुरू केले. मात्र, रोकड व्यवहारांसाठी चाव्याच नसल्याने केवळ लॉकर्सचे व्यवहार झाले. पैसे काढणे, टाकणे यासारखे इतर सर्व व्यवहार ठप्प होते. आज जवळपास 80 अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू झाले होते. मात्र, इतर कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवल्याने बॅँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत होऊ शकले नाही.
गुरुवारी बॅँकेचे कामकाज काही अधिका-यांच्या मदतीने सुरू करता आले. दिवसभरात मुख्य शाखेतून नव्वदहून अधिक लोकांनी लॉकर्समधून ऐवज काढून नेला. ठेवी, पैसे काढण्यासाठी आलेल्यांना मात्र हात हलवतच परतावे लागले. रोख व्यवहारासाठी या अधिका-यांकडे चाव्याच नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. कॅशिअर कर्मचा-यांकडून कॅश लॉकरच्या चाव्या व्यवस्थापन ताब्यात घेत असून, कर्मचारी व अधिका-यांचे मदतीने कॅश व्यवहारही लवकरच सुरू होणार असल्याचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून बेकायदा कर्जवितरणाची माहिती जाहीर करणार असल्याचे कर्मचा-यांचे नेते आशिष जाधव यांनी स्पष्ट केले.