आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनलक्ष्मी’ कर्मचार्‍यांचे आंदोलन कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जनलक्ष्मी सहकारी बॅँकेचे कामकाज सोमवारपासून सुरू होण्यासाठी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यात आमदार बबनराव घोलप यांनी केलेली मध्यस्थी अयशस्वी ठरली. शनिवारी सकाळी आणि सायंकाळी दोन वेळेस घोलप यांनी मध्यस्थी करीत चेअरमन माधवराव पाटील आणि कर्मचारी नेते यांची बैठक घेऊन चर्चा केली. मात्र, व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यास नकार देण्यात आल्याने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार कर्मचार्‍यांनी व्यक्त केला.
या दोन्ही बैठकीत कर्मचार्‍यांनी त्यांच्या 22 पैकी चार मागण्या तत्काळ मंजूर करण्याबाबत मागणी केली. प्रत्येकी दीड लाखांचा फरक देण्यात यावा, प्रत्येकी दोन हजार रुपयांची दरमहा पगारवाढ द्यावी, महागाई निर्देशांक भत्ता मिळावा आणि ज्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्या विनाशर्त मागे घ्याव्यात, या मागण्या चर्चेदरम्यान कर्मचार्‍यांनी लावून धरल्या.