आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक येथे जीप जाळपोळ प्रकरणी पठाण बंधूंना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: द्वारका सर्कलवर प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपची जाळपोळ केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी शेरखान पठाण व फिरोज शरीफखान पठाण या बंधूंना अटक केली आहे. प्रवासी घेण्यासाठी जीपचालकांमध्ये नंबर लावण्याच्या स्पर्धेतूनच हा प्रकार घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
यासंदर्भात सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले, नरेंद्र गायकवाड व त्यांच्या पथकाने पठाण बंधूंना अटक केली. ते दररोज रात्री पुलाखाली जीप उभी करीत असत. मात्र, मंगळवारी रात्री घटनेच्या अगोदर काही तास त्यांनी जीप काढून घरी नेली. पहाटे चारच्या सुमारास द्वारका चौकात येणारे हे भाऊ आले नाही. नंतर सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास शेरखान घटनास्थळी चेष्टामस्करी करीत होता. त्याचबरोबर पोलिसांना उद्देशून ‘मयताच्या अंत्यसंस्काराचे साहित्य घेऊन आले की काय’, असा प्रश्न विचारल्याची माहिती मिळाली. दहा दिवसांपूर्वी शेरखानच्या दादागिरीला कंटाळून सिन्नर घाटात त्याची जीप ढकलून देण्यात आली होती. मात्र, त्याने पोलिसांत तक्रार न करता जीप पेटवून सूड उगवल्याचा संशय आहे.