Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Nashik Jilha Patrakar Sangh Puraskar Jahir

नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी | Jan 03, 2012, 12:51 PM IST

  • नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

नाशिक: नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव तसेच जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली. त्यामध्ये दैनिक ‘दिव्य मराठी’चे सिनियर रिपोर्टर भूषण महाले व मालेगावचे प्रतिनिधी शंकर वाघ यांचा समावेश आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर कावळे (नाशिक) व रसिकलाल शहा (कळवण) यांना प्रदान केला जाणार आहे.
पत्रकार दिनाचे 6 जानेवारी रोजी औचित्य साधून पालकमंत्री छगन भुजबळ तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातील विविध दैनिक तसेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधी, वार्ताहर तसेच छायाचित्रकारांना जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. तसेच 35 वर्षांहून अधिक काळ पूर्णवेळ काम करणार्‍या पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सन 2011मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पत्रकारांचा यात समावेश असून, ‘दिव्य मराठी’चे भूषण महाले व शंकर वाघ यांनाही गौरविण्यात येणार आहे. इतर वृत्तपत्राचे प्रतिनिधी तसेच उपसंपादकांमध्ये वैशाली सोनार -शहाणे (देशदूत), सुयोग जोशी (लोकमत), नरेंद्र जोशी (सकाळ), आसिफ सय्यद (पुण्यनगरी), दीपक रत्नाकर (गांवकरी), चारुशिला कुलकर्णी (लोकसत्ता), भावेश ब्राम्हणकर (महाराष्ट्र टाइम्स), रेमेश कापडे (भ्रमर), नीलेश पवार (ई-टीव्ही मराठी), मुकुल कुलकर्णी (झी-24 तास), बब्बू शेख (आयबीएन लोकमत), आझाद आव्हाड (सहारा समय), तुषार काचोळे (सी-न्यूज), रोहन दाणी (डी-न्यूज), उत्कृष्ट छायाचित्रकार रवी जाधव (लोकमत), नीलेश तांबे (देशदूत), उत्कृष्ट पत्रलेखक भरत जैन, नाशिक, तर उत्कृष्ट कृषी पत्रकारिता, योगेश पाटील (गांवकरी) यांचा समावेश आहे. ग्रामीण जिल्हा प्रतिनिधींमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍यांमध्ये सुनील काळे (लोकमत-रेडगाव), सुभाष पूरकर (देशदूत वडनेर भैरव), गजानन आहेर (पुण्यनगरी- नांदगाव), गिरीश जोशी (लोकमत- मनमाड), प्रकाश साबरे (लोकमत- अंदरसूल), लक्ष्मण घुगे (देशदूत- राजापूर), आनंदा जाधव (गांवकरी -निफाड), हरुणभाई शेख (देशदूत-लासलगाव), संदीप भोर (गांवकरी- सिन्नर), दत्ता खुळे (सकाळ- वडांगळी), प्रकाश टाकेकर (गांवकरी- नाशिक ग्रामीण), मंगलसिंग राणे (देशदूत- नाशिकरोड), नितीन गांगुर्डे, (देशदूत- दिंडोरी), दिगंबर पाटोळे (सकाळ-वणी), मनोज देवरे (लोकमत- कळवण), अंबादास देवरे (सकाळ- सटाणा), शरद नेरकर (लोकमत- नामपूर), सोमनाथ जगताप (पुण्यनगरी- देवळा), वसंत रौदळ (सकाळ - उमराणे), प्रमोद सावंत (सकाळ- मालेगाव), शरद मालुंजकर (गांवकरी - इगतपुरी), केशव ढोण्णार (गांवकरी- त्र्यंबकेश्वर), एकनाथ बिरारी (देशदूत- सुरगाणा), रामदास शिंदे (लोकमत- पेठ), स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी भगवान पाटील (सी-न्यूज- मालेगाव) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Next Article

Recommended