आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयभद्रा रायडर्स एबीसी टायगर्सची प्रतिस्पर्ध्यांवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - के.व्ही.एन.नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात जयभद्रा रायडर्सने सर्वज्ञ रायडर्सचा ३४ विरुद्ध २२ असा पराभव करीत अागेकूच कायम राखली अाहे. या सामन्यातील सर्वाेत्कृष्ट रायडरचे बक्षीस जयभद्राच्या दादा अाव्हाडला, तर राहुल काेकणेला उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार प्रदान करण्यात अाला.
डाेंगरे वसतिगृह मैदानावरील गोपीनाथ मुंडे क्रीडानगरीत सुरू असलेल्या नाशिक कबड्डी प्रीमियर लीगच्या या सामन्यात राकेश खैरनार, दादा आव्हाड, राहुल कोकणे, गोकुळ सांगळे, शेखर अहिरे, विजय पाटील यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर जयभद्राने उत्तम खेळा केला. त्यांनी स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवून लीगमध्ये आघाडी नोंदवली आहे. मध्यंतराला जयभद्रा रायडर्सकडे २४ विरुद्ध अशी भक्कम १९ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर कालचा उत्कृष्ट चढाईपटू ठरलेला अझीम सय्यद उत्कृष्ट पकडीचा बहुमान मिळवलेला संजय महाजन यांचा काहीच प्रभाव जयभद्रा रायडर्सच्या संरक्षकांनी चालू दिला नाही हा सामना सहज जिंकला.
सामन्याचे पारितोषिक वितरण सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे, रोहकले, नगरसेवक अनिल मटाले, कालिका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अण्णा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

एबीसीटायगर्सची बाबाज फायटर्सवर मात : साेमवारीझालेला दुसरा सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या सामन्यात एबीसी टायगर्स संघाने बाबाज फायटर्स संघावर ४२ विरुद्ध ४१ असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला ए. बी. सी. टायगर्सकडे २३ विरुद्ध १६ अशी गुणांची भक्कम आघाडी होती.

मध्यंतरानंतर बाबाज फायटर्सच्या बलराम पायघन, कुंदन सोनवणे, धनंजय जाधव यांनी पिछाडी भरून काढली. परंतु, शेवटच्या क्षणी झालेल्या एका चुकीमुळे बाबाज फायटर्सला पराभवाचा सामना करावा लागला. एबीसी टायगर्स संघाच्या पवन ठाकूरला उत्कृष्ट रायडरचा, तर बाबाज फायटर्सच्या धनंजय जाधवला उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात अाला. यावेळी माेठ्या संख्येने कबड्डीप्रेमी उपस्थित हाेते.

सामने सायंकाळी पासून
प्रेक्षकांच्या अाग्रहास्तव मंगळवार दिनांक १३ पासून दरराेज सायंकाळी ऐवजी सायंकाळी वाजेपासून सामन्यांना प्रारंभ करण्यात येणार आहे. दरराेज तीन कबड्डी सामने खेळविण्यात येणार अाहेत. त्यामुळे नागरिकांना मंगळवारपासून (दि. १३) दरराेज वाजेपासूनच या सामन्यांचा थरार अनुभवता येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...