आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील काळाराम मंदिरात चोरी, संस्थानचे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील काळाराम मंदिराच्या बाहेर भाविकांच्या वस्तू चोरी जाण्याचे प्रकार घडत असतानाच आता मंदिराच्या आवारातही भाविकांच्या वस्तू आणि पर्स चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी हरियाणा येथील एका महिलेची पर्स चोरी करण्यात आली. या चोरीबाबत संस्थानने काहीही बोलण्यास नकार दिला. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी या महिलेचे नाव जाहीर केले नाही.

काळाराम मंदिर परिसर सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत असूनही चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात सर्वत्र कॅमेरे लावण्यात आले आहेत. कॅमेर्‍याचे केवळ प्रक्षेपण सुरूअसते. मात्र रेकॉर्ड काहीही होत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हरियाणातील महिलेच्या पर्समध्ये 25 हजार रुपयांची रक्कम असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेने माहिती दिल्यानंतर पोलिसांसह भाविकांनी तत्काळ संस्थान परिसरात चोराला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणीही सापडले नाही.