आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik, Kalvan, Manur Adivasi Student Project Hostel Work Stop

लालफितीत अडकले मानूरचे वसतिगृह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळवण: आदिवासी विकास प्रकल्पाकडून मंजूर झालेले मानूर येथील भव्य वसतिगृहाचे तीन कोटी 35 लाख रुपयांचे काम बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे आठ महिन्यांपासून बंद आहे. या वसतिगृहाचा उपयोग होणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, याबाबत आदिवासी व बांधकाम विभाग याची माहिती अद्याप देऊ शकलेला नाही.
आदिवासी प्रकल्पमार्फत वसतिगृहाच्या कामाला तीन कोटी 35 लाख रुपये 2009 मध्ये मंजूर झाले आहे. या विभागाने निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला. त्यानुसार बांधकाम विभागाकडून कामाची वर्कऑर्डर 27/8/2009 मध्ये झाली व विजय शिरसाठ यांच्या विजय एंटरप्रायजेसने सर्व शासकीय अटीनुसार कामाला सुरुवात केल्याचे बांधकाम विभागास कळवले आहे.
एक कोटी 87 लाखांचे काम करताना निधी उपलब्ध झाल्यावर संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या असहकार्यामुळे सदर कामाची मुदत संपण्याआधी 1 एप्रिल 2011 मध्ये आठ महिन्यांपासून काम बंद केले असल्याचा खुलासा केला आहे. ठेकेदारावर कारवाई करीत 1 जूनपासून रोजी 500 रुपये दंड आकारला आहे. या कामाची मुदतही 31 मे 2011 मध्येच समाप्त झालेली आहे.