आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘किकवी’साठी फेरप्रस्ताव, पुढील महिन्यात पुन्हा वन सल्लागार समितीची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वन सल्लागार समितीने ताशेरे ओढत किकवी प्रकल्पाला परवानगी नाकारल्यानंतर चुका दुरुस्त करून फेरप्रस्ताव सादर करण्याचा निर्णय जलसंपदाने घेतला आहे. पुढील महिन्यात वन सल्लागार समिती बैठकीत हा प्रस्ताव ठेवणार असल्याचे कार्य अभियंता संघवी यांनी सांगितले.

वन व शेतजमिनीचा समावेश असलेली जागा किकवीसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. 550 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 2500 दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. मात्र, पश्चिम घाटातील अतिसंरक्षित क्षेत्रातील जागा असल्यामुळे पुनर्वसनाची हमी दिल्याशिवाय, किंबहुना त्यासाठी ठोस योजना दाखवल्याशिवाय परवानगी घेताच कशी, असा सवाल वन सल्लागार समितीने केला. याबरोबरच गंगापूर, गौतमी - गोदावरी, काश्यपी या धरणांमधून नाशिकला किती पाणी येते याची माहिती, नवीन धरण बांधण्याचा उद्देश, भविष्यातील व वर्तमानातील पाणी वापराचा ताळमेळ याची माहिती न दिल्याचे कारण देत किकवीचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. वन सल्लागार समितीच्या सूचनांप्रमाणे नवीन प्रस्ताव पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पालकमंत्र्यांचे लक्ष कोठे ?
निवडणुकांमध्ये किकवी धरण करणारच, असे आश्वासन देणार्‍या पालकमंत्र्यांचे लक्ष कोठे आहे? वाढत्या शहरीकरणात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी धरणे बांधण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मांडली आहे. अधिकारी चुकीचे प्रस्ताव दाखल करत असतील तर मंत्र्यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे. चुकीचे सव्र्हे, सिंचनाची बेकायदा कामे करून घोटाळे करण्याचा राष्ट्रवादीचा प्रताप यापूर्वीच उघड झाला आहे. किकवी झाले तर नाशिकसह जिल्ह्याचा पाणी प्रश्नही निकाली निघेल. वसंत गिते, आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विनाकारण राजकारण करू नये..
किकवी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय वनमंत्री जयंती नटराजन यांच्याकडे दीड महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे. त्रुटी दूर करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. वन मंत्रालयाकडून परवानगी मिळून हा प्रश्न निकाली निघेल. यात कुणी राजकारण करू नये. पुढील आठवड्यात पुन्हा केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. समीर भुजबळ, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस