आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथिंबिरीची एक जुडी 340 रुपयांत! आजवरचे सर्व विक्रम मोडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रोजच्या जेवणात स्वादासाठी वापरली जाणारी कोथिंबीरसुद्धा आता महागाईच्या शर्यतीत उतरली आहे. चढय़ा भावाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत मंगळवारी येथील बाजार समितीत एका व्यापार्‍याने कोथिंबिरीच्या 100 जुड्यांसाठी चक्क 34 हजार रुपये मोजले! तब्बल 340 रुपयांची ही जुडी सुरतकडे रवाना झाली असून, तेथील ग्राहकाच्या हाती पडेपर्यंत या जुडीची किंमत 400-450 रुपयांच्या घरात जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

येथील बाजार समितीत कोथिंबीरला शेकडा 34 हजार रुपये असा ‘न भूतो..’ भाव मिळाला. देवठाण (ता. अकोले) येथील संजय किसन दराडे यांनी 202 जुड्या आणल्या होत्या. ही कोथिंबीर सुनील डेंबरे या व्यापार्‍याने खरेदी केली असून, ती सुरत व बडोदा येथे विक्रीसाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच गुंठय़ात 65 हजार रुपये
मी पाच गुंठे क्षेत्रात ही कोथिंबीर लावली होती. त्यातून मला जवळजवळ 65 हजार रुपये खर्च वजा जाता मिळतील. संजय किसन दराडे, शेतकरी

सुरतला 450 रुपये भाव
नाशिकला 340 रुपयांना एक जुडी या भावाने खरेदी केलेली कोथिंबीर सुरत व तेथून पुढे बडोदा येथे जाईपर्यंत तिची विक्री 425 ते 450 रुपये निश्चित होईल. सुनील काशीनाथ डेंबरे, व्यापारी

भाज्‍यांचे दर कडाडले... मुंबईतील भाज्यांचे दर वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...