आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यातील साधुंसाठी एवढा खर्च कशाला? संभाजीराजेंनी आरक्षण मेळाव्यात डागली तोफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - परराज्यातून येणार्‍या साधुंसाठी केंद्र व राज्य शासन सिंहस्थाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करते. मुळात या खर्चाची काहीही आवश्यकता नसून हा निधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी खर्च करावा असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे 14 वे वंशज युवराज संभाजीराजे यांनी केले.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सातपूर येथे आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून संभाजीराजे बोलत होते. राज्य शासनावर टीका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील सर्वच महत्त्वाची खाती मराठा समाजाकडे आहेत. मात्र, केवळ मतांच्या लालसेपोटी मराठा समाजास आरक्षण देण्यास ते धजावत नाही.छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात 50 टक्के आरक्षण दिले होते. यात बहुजन समाजासह मराठा समाजदेखील होता. माझ्या पूर्वजांनी सर्वजातीधर्मासाठी लढा दिला आहे. ज्या दिवशी मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्रित येतील तेव्हा मी महाराष्ट्राला दाखवून देईन की छत्रपतींचे वंशज काय आहे? मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ नाशिकमधून सुरू झाली असून ही लढाई आता जिंकायचीच असा निर्धारही या वेळी त्यांनी केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दिनकर पाटील, विलास पांगारकर, छावाचे जिल्हाध्यक्ष करण गायकर, सुभाष जावळे आदी उपस्थित होते.