आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाचा ‘मेळा’: बोगस साधूंना रोखण्यासाठी ओळखपत्र !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्यात येणारे बाेगस साधू-महंत शंकराचार्यांना राेखण्यासाठी मतदार कार्डाच्या धर्तीवर अाेळखपत्र देण्याचा निर्णय अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी जाहीर केला. या अाेळखपत्रांवर अाखाड्याचे अध्यक्ष सचिवांच्या स्वाक्षऱ्या असतील. मात्र, या प्रक्रियेतून साध्वी त्रिकालभवंता यांनी स्थापन केलेल्या महिलांच्या परी अाखाड्याला मात्र वगळण्यात येईल, असेही जाहीर करण्यात अाले. त्यामुळे १४ जुलैला ध्वजाराेहणाने प्रारंभ झालेल्या या कुंभपर्वातील साधू-साध्वींमध्ये उद्भवलेला वाद शमण्याचीदेखील चिन्हे दिसत नाहीत.
नरेंद्र गिरी यांनी सांगितले की, त्रिकालभवंता यांच्यासारख्या बनावट शंकराचार्यांना कुंभमेळ्यातील सहभागापासून राेखण्यासाठी अाम्ही ही अाेळखपत्रे तयार केली अाहेत. त्रिकाल भवंता यांनी काेठूनही शिक्षा- दीक्षा घेतलेली नाही. ध्वजाराेहण झाल्यामुळे अाता कुंभपर्वाला अाैपचारिकरीत्या सुरुवात झालेली अाहे. अाता सर्वच अाखाडे १४ अाॅगस्टला कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये पाेहाेचतील. अाखाडा परिषदेतर्फे अाम्ही १० अाॅगस्टपासूनच अाेळखपत्र वाटपाची माेहीम हाती घेणार अाहाेत. पहिल्याच दिवशी निरंजनी अाखाड्यातील साधू-महंतांना ती दिली जातील.

न्याय न मिळाल्यास जिवंत समाधी : कल्पवृक्षगिरी महाराज
त्र्यंबकेश्वर- स्थानिकनेते अाणि दलालांकडून साधू-महंतांना देण्यात येत असलेला त्रास प्रशासनाने थांबवल्यास गुरुपाैर्णिमेला जिवंत समाधी घेण्याचा इशारा महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांनी दिला अाहे. त्र्यंबकेश्वरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील साधूंना १९३० मध्ये ग्रामस्थांनी दीड एकर जागा दान दिली हाेती. दरम्यान, या जागेजवळ राजस्थानातील नाथद्वारा भागातून ४० संन्यासी यज्ञ अनुष्ठानासाठी अाले अाहेत. पाली (राजस्थान) येथील हरिअाेम अाश्रमाचे स्वामी प्रणवानंद तीर्थ यांनी यज्ञासाठी सर्व तयारी केली असताना काही स्थानिक नेते, दलालांनी या साेहळ्यास विराेध करत पत्र्यांचे शेड ताेडणे, साधूंना धमकावणे असे प्रकार सुरू झाले अाहेत. प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष हाेत अाहे.

प्रशासनच ठरवेल काेणाला द्यायचा प्रवेश : त्रिकाल भवंता
अाखाडापरिषदेच्या विराेधात भूमिका घेणाऱ्या परी अाखाड्याच्या अध्यक्षा साध्वी त्रिकालभवंता यांनी मात्र अाम्हाला अशा काेणत्याही अाेळखपत्राची काेणत्याही अाखाड्याच्या मान्यतेची अावश्यकताच नसल्याचे म्हटले अाहे. ‘अाम्ही काेणत्याही अाखाड्यात प्रवेश करणार नाही. त्यांच्या पेशवाईतही सहभागी हाेणार नाही. त्यात काेणाला प्रवेश द्यायचा, काेणाला नाही, याचा निर्णय नाशिकचे जिल्हा प्रशासन घेईल. अाखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी अगोदर अंतर्गत वाद साेडवावेत, त्यानंतर इतरांना अाेळखपत्र अाणि सल्लेही द्यावेत,’ असे त्या म्हणाल्या.