आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात शोभायात्रा अन‌् नियोजनाची "शोभा', रांगा भाविकांच्या अन् वाहनांच्याही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- श्री संप्रदायाच्या विशाल गंगापूजन मिरवणुकीमुळे नाशिकनगरी बुधवारी (दि. ९) अध्यात्म रंगात न्हाऊन निघाली. मात्र, अनी आखाड्यांच्या साधू-महंतांसह शाही मार्गाने रामकुंडावर गेलेली ही शोभायात्रा दुपारी परतण्याचे पूर्वनियोजित असतानाही पोलिसांनी योग्य नियोजन केल्याने ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

शोभायात्रा गंगापूजन करून परतणाऱ्या भाविकांना मालेगाव स्टॅण्डमार्गे निमाणी, औरंगाबाद नाका मार्गे तपोवन असा मार्ग दर्शविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन तासन् तास वाहनांच्या रांगा लागल्या. या मार्गाऐवजी पोलिसांनी रामकुंडावरूनच परतीचा मार्ग बदलून दिला असता, तर ही कोंडी टळू शकली असती, अशी प्रतिक्रिया परिसरातील रहिवासी वाहनचालकांनी व्यक्त केली.
या शोभायात्रेपाठोपाठ वेगवेगळ्या मिरवणुका दुपारनंतर अचानक तडाखेबंद हजेरी लावलेल्या पावसाने नियोजनाचा फज्जा उडून कोंडीत भर पडल्याने संपूर्ण शहरातच वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते.
मोठा शिष्य परिवार असलेल्या नरेंद्राचार्य महाराजांची शोभायात्रा पर्वणीच्या शोभायात्रेप्रमाणेच भव्य होणार याचा अंदाज पोलिसांना असतानाही या गर्दीचे नियोजन करण्यात यंत्रणेला अपयश आले. अंदाजानुसार एक लाखाहून अधिक भाविकांच्या वाहतूक नियोजनासाठी किमान ५०० हून अधिक पोलिस कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता असताना मोजकेच कर्मचारी विविध ठिकाणच्या रस्त्यांवर दिसले. पोलिसांनी तपोवन ते रामकुंडापर्यंत उर्वरितपान
अशी टळली असती कोडी
रामकुंडावरीलस्नानानंतर भाविकांना गौरी पटांगणमार्गे नदीच्या पंचवटी तीराकडून पंचवटी अमरधामनजीकच्या रस्त्याने थेट बडा लक्ष्मीनारायण लॉन्सजवळून साधुग्राममधील नरेंद्राचार्य महाराजांच्या मंडपापर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होते. त्यामुळे शहरातील विविध भागात झालेली वाहतूक कोंडी निश्चितच टळू शकली असती.
भक्तांकडून शिस्तीचे दर्शन
वाहतूकपोलिसांच्या नियोजनाचा फज्जा उडाला असताना नरेंद्राचार्य महाराजांच्या शिष्य परिवाराने अतिशय शिस्तीने ठरवून दिलेल्या मार्गांवरून शोभायात्रा संपन्न केली.

इतरत्रही खोळंबा
दरम्यान,साधू-महंतांच्या शाेभायात्रा, मिरवणुकांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असतानाच दुपारी नंतर आलेल्या पावसाने वाहतूक मंदावली. त्याच वेळी शाळा, कार्यालये सुटल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊन द्वारका चौक, मुंबई नाका, राणेनगर, मायको सर्कल, शरणपूररोड, सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून अनेकांना तासभर कोडीत अडकावे लागल्याचे दिसून आले.

श्रीसंप्रदायातर्फे बुधवारी शहरात काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध शोभायात्रेत डोक्यावर तुळशी वृंदावन मंगल कलश आणि हाती भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या भाविक. इन्सेटमध्ये रामकुंड परिसरात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी गंगापूजन केल्यावर स्नान करताना भाविक.
४०- कलापथकांनी वाढविली शोभायोत्रेची रंगत.
०५- तास चाललेल्या शोभायात्रेत तब्बल लाखभर भाविकांनी नोंदवला शिस्तबद्ध सहभाग.
६०- निशाण ठरले शोभायात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शोभायत्रेचे काही फोटो....