आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात्त्विक अाहारातून हाेते साधू-महंतांची एकाग्रता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतात साधू-संतांना देवांच्या बराेबरीचे स्थान दिले जाते. काही संदर्भांमध्ये तर देवापेक्षाही वरचे स्थान साधू-महंतांना अाहे. साधूसमाज धर्माचे काटेकाेरपणे पालन करताे, असा ठाम विश्वास असल्यामुळे त्यांना देवासमान मानले जाते अाणि समाजही त्यांचे अनुकरण करताे. साधूही काम, क्राेध, माेह, मत्सर या अवगुणांपासून दूर राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी अाहाराचा सर्वाधिक चांगला वापर केला जाताे. अर्थात अाहाराला धर्माचरणाचे काेंदण लाभलेले असते. धर्माच्या विभिन्न अंगांमध्ये प्रमुख घटक अाहे ताे म्हणजे अाहाराची शुद्धी. याचा उल्लेख भगवद‌्गीतेतही करण्यात अाला अाहे. अाहारशुध्दीत अभक्ष्य भक्षण करणे निषिद्ध मानण्यात अाले अाहे.
अाहारात प्रामुख्याने सात्विक, तामसी अाणि राजसी असे प्रकार असतात. सात्विक अाहारात ताजी फळे, भाज्या, मूग, नाचणी, सत्तू, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यांचा समावेश हाेताे. राजसिक अाहारात खूप तळलेले, तिखट, चमचमीत पदार्थांचा समावेश हाेताे. तर, तामसिक अाहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश हाेताे. साधू समाज सात्विक अाहाराचे सेवन करीत असताे. जसे सकाळी दूध प्राषण करणे. छांदोग्य उपनिषदात ऋषी अरुणींनी म्हटल्याप्रमाणे, मन अन्नमय आहे. प्राण आपोमय आहे व वाक् (बुद्धी) तेजोमयी आहे. आहार, निद्रा, भय, मैथून या चार मनकेंद्रांचा नीट अभ्यास करून स्वतःची शरीरप्रकृती व मनप्रकृती आरोग्यदायी राखण्यासाठी उचित ‘आहार' अन् ‘विहार' सांभाळावे लागतात. या चार केंद्रांचे व्यापार आणि म्हणूनच शरीराचेही व्यापार ज्या कार्यकारी तत्त्वांवर अवलंबून असतात त्यांना ‘भावशारीरि गुण' म्हणतात, जे मूळ सत्व, रज व तम या गुणांपासून तयार होतात. साधू समाजाने शरीर शुद्धीसाठी सात्विक अाहाराची निवड केलेली दिसते. गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’। स्वस्थ शरीर हा स्वस्थ मनाचा अाधार अाहे. स्वस्थ मन ही सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून सशक्त समाज निर्मिती करू शकताे. गीतेमध्ये शरीर संशुध्दीच्या सर्व प्रमुख कारणांचा बारकाव्याने विचार करण्यात अाला अाहे. गीतेच्या १७व्या अध्यायात म्हटले अाहे की,
आयु: सत्त्वबलारोग्यसुख प्रीति विवर्धना:।
रस्या: स्निग्धा: स्थिरा हृद्या आहारा: सात्त्विकप्रिया:।
कट्वम्ललवणात्युष्ण तीक्ष्णरूक्ष विदाहिन:।
आहारा राजसस्येष्टा दु:खशोका भय प्रदा:।
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्।
म्हणजेच अायु, बुद्धी, बल, अाराेग्य, सुख, प्रेम वाढविणाऱ्या बाबी, रसयुक्त अाणि स्थिर राहणारे तसेच मनाला प्रिय वाटतील असे भाेज्य पदार्थ सात्त्विक पुरुषाला अर्थात साधूृ-महंतांना प्रिय असतात. हाच अाहार साधूंच्या शरीर धर्मानुष्ठानाचे कारण असताे. शरीरातून धर्माला सेवन करण्यासाठी अाणि माेक्षापर्यंत पाेहाेचण्यासाठी अाहार करीत असतात.

भिक्षा मागून अाहार
साधूंमध्ये प्रामुख्याने भिक्षा मागून अाणलेल्या अन्नास पवित्र मानले जाते. त्यासाठी साधूंचे सेवक पहाटेच भिक्षा मागायला जातात. मात्र, अाता ही प्रथाही कमी-कमी हाेताना दिसत अाहे.