आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची साडेतीन किलोमीटर पायपीट कमी करण्याचे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - कुंभमेळ्यात भाविकांची सिन्नर फाटा ते दसक घाटापर्यंतची साडेतीन किलोमीटरची पायपीट वाचविण्यासंदर्भात बुधवारी (दि. २२) विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाचपणी केली. यासाठी सिन्नर फाट्यापासून सैलानीबाबा चौकापर्यंत शहर बस सोडण्यावर अधिकारी वर्गाचे एकमत झाले. मात्र, बस थांबविण्यासाठी परिसरात जागा उपलब्ध नसल्याने ठोस निर्णय होऊ शकला नाही. प्रत्यक्षात निर्णयासाठी मोकळ्या जागेचा शोध घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.shik
नाशिक-पुणे महामार्गावरून येणारी खासगी वाहने मोहगाव-चिंचोली शिवारात थांबवून शहर बसने भाविकांना सिन्नर फाटा परिसरात कृषी उत्पन्न उपबाजार आवारापर्यंत आणले जाणार आहे. तेथून दसक गोदावरी घाटापर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा प्रवास भाविकांना पायीच करावा लागणार आहे. ज्येष्ठांसाठी हे अंतर जास्त असल्याने ते कमी करण्याबाबत चर्चा झाली. पर्यायी थांबा म्हणून जेलरोडच्या सैलानीबाबा चौकाचा विचार करण्यात आला. मोहगाव ते सैलानीबाबा चौकापर्यंत बस सोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंके, एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बंड अधिकारी उपस्थित होते.
विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन अन्य अधिकाऱ्यांनी दसक गोदावरी घाटावरील सुविधांची पाहणी केली.

बाह्य वाहनतळावर आठ शेड
मोहगावशिवारातील १६ हेक्टर क्षेत्रात दोन निवाराशेड, ३५०० वाहन क्षमतेचे वाहनतळ, ४० शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या तीन स्टाॅलची उभारणी करण्यात येत आहे. चिंचोली शिवारात सहा निवारा शेड, कम्युनिटी किचन, २६ हेक्टर क्षेत्रात ६५०० वाहन क्षमतेचे वाहनतळ, १७ स्टॉल्स उभारले जात आहेत.

दुसऱ्यादिवशीही बसमधून दौरा
विभागीयआयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही परिवहन महामंडळाच्या बसने सिंहस्थ नियोजन, सोयी-सुविधांचा पाहणी दौरा केला.

भाविकांसाठी क्लोक रूम
मोहगाव,चिंचोली शिवारातील वाहनतळावर भाविकांचे सामान, वस्तू ठेवण्यासाठी क्लोक रूमची व्यवस्था केली जात आहे. तसेच पोलिस चौकी, आरोग्य पथक तैनात असणार आहे. सार्वजनिक बांधकाम, महसूल महावितरणचा कक्ष माहिती केंद्र असणार आहे.

पथकाने या भागात केली पाहणी...
अधिकाऱ्यांच्या पथकाने मोहगाव येथील वाहन पार्किंग, चिंचोली शिवारातील बसस्थानक, नाशिकरोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार, सिन्नरफाटा रेल्वे स्थानक परिसर, सैलानीबाबा चौक, दसक, पंचक, नांदूर, मानूर येथील गोदावरी घाट मार्ग आणि इतर सुविधांची पाहणी केली.