आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वणी तोंडावर, तरीही भाविक मार्ग अंधारातच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धुळे मार्गाकडून येणाऱ्या भाविक मार्गावरील पथदीप बंद असल्याने पर्वणीकाळात भाविकांना अंधारात चाचपडत घाट मार्गाकडे जावे लागणार आहे. महामार्ग हॉटेल जत्रा ते नांदूरनाका भागातील सर्व पथदीप बंद असल्याने नागरिकांमध्ये रस्त्यावर असुरक्षितता वाटत आहे. पर्वणीकाळात या मार्गावरून सर्वाधिक भाविक येण्याचा अंदाज पोलसांनी वर्तविला असतानाही पालिकेकडून बंद पथदीपांकडे डोळेझाक सुरू आहे.
नव्या नियोजनानुसार निलगिरीबाग येथे अांतरपार्किंग आहे. भाविकांना हॉटेल जत्रामार्गे पायी वा बसने तेथे जावे लागेल. पर्वणीकाळात सर्व पथदीप सुरू करण्याची ग्वाही पालिकेने दिली होती, मात्र आजही अंधार कायम आहे. हा परिसर निर्जन असल्याने रात्री मद्यपींचा वावर वाढला आहे. अंधारामुळे अपघातांचे धोके कायम आहेत. पर्वणीच्या पूर्वी पथदीप सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या मार्गावर पथदीप बंद
मेडिकल फाटा उड्डाणपूल ते ट्रक टर्मिनल, हॉटेल जत्रा ते नांदूर नाका, आणि निलगिरी बागेकडे जाणारा आळंदी कालवा रस्त्यावरील जवळपास सर्वच पथदीप बंद आहेत.