आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही मिरवणूक सकाळी सहापासून, पोलिस आयुक्तालयातील बैठकीत हाेणार अंतिम निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राम मधील आखाड्यांच्या ध्वजारोहणाचा सोहळा पार पडल्यानंतर आता पहिल्या पर्वणीसाठी जिल्हा प्रशासनासह पोलिसांकडून नियोजन सुरू झाले आहे. शहर पोलिसांनी आखाड्यांतील प्रमुखांची भेट घेऊन नियोजनाबाबतची माहिती दिली. त्यानुसार दि. २९ ऑगस्ट रोजीच्या पहिल्या शाही मिरवणुकीला एक तास अगाेदर म्हणजेच सकाळी वाजता प्रारंभ व्हावा. शाहीस्नानासाठी प्रथम निर्वाणी अाखाडा मार्गस्थ होईल. त्यानंतर साधारण अर्धा तासाच्या अंतराने क्रमाने दिगंबर आणि निर्मोही आखाडा शाहीमिरवणुकीत सहभागी होतील, असे पाेलिस प्रशासनाचे पूर्वनियाेजन असून, तिन्ही आखाड्यांच्या महंतांनी त्याविषयी समाधान व्यक्त केले. मात्र, अंतिम निर्णय पोलिस आयुक्त कार्यालयात साेमवारी (दि. २४ ऑगस्ट) हाेणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, असे महंतांनी सांगितले.

गत कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली हाेती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्याविषयी अाखाड्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, पंकज डहाणे, उपायुक्त डॉ. दीपक साकोरे, सहायक पोलिस उपायुक्त विजय चव्हाण यांनी शुक्रवारी तिन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांची भेट घेतली. या वेळी निर्वाणी, दिगंबर, निर्माेही या आखाड्यांच्या महंतांबरोबर शाही मिरवणुकीबाबत चर्चा झाली. या दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी साधू-महंतांना संगणकावर मिरवणूक मार्ग, रामकुंड परिसर, परतीचा मार्ग याबाबतची सविस्तर माहिती दिली. शाही मिरवणुकीच्या वेळेबाबतही चर्चा झाली.

आखाडावेळ
निर्वाणी६.०० वाजता
दिगंबर ६.३० वाजता
निर्मोही ७.०० वाजता

खालशांच्या शोभायात्रेस परवानगी अावश्यक
खालशांच्याशोभायात्रेला आखाड्याची मान्यता अनिवार्य करण्यात अाली अाहे. त्यामुळे पाेलिसांनी अाखाड्यांशी चर्चा करता कुणालाही परवानगी देण्यात येऊ नये, असेही या वेळी महंतांनी पोलिसांना सांगितले.

पहाटे वाजता घेणार रामकुंडाचा ताबा
पहिल्यापर्वणीच्या दिवशी पोलिस प्रशासनाकडून रामकुंड परिसराचा ताबा पहाटे वाजता घेतला जाणार आहे. शाही मिरवणुकीसाठी केलेले नियाेजन दिगंबर अाखाड्याच्या महंतांना संगणकाच्या माध्यमातून समजवून सांगताना पाेलिस उपायुक्त पंकज डहाणे.

अशी निघेल मिरवणूक
परंपरेनुसारयंदाही निर्वाणी आखाडा प्रथम स्थान करणार असून, त्यांच्या शाही मिरवणुकीला सकाळी वाजता प्रारंभ होईल. त्यानंतर ६.३० वाजता दिगंबर आखाडा, तर वाजता निर्माेही आखाड्याची मिरवणूक निघेल, असे पोलिस प्रशासनाचे ढाेबळ नियाेजन अाहे. तिन्ही प्रमुख आखाड्यांमध्ये किमान २०० मीटरचे अंतर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रत्येक आखाड्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. मिरणुकीत हत्ती, घोड्यांचा समावेश असेल का? याबाबतही पाेलिसांनी विचारणा केली.

याेग्य नियोजन
^शाहीस्नानासाठी परंपरेनुसार आखाड्यांच्या मिरवणुका निघतील. त्यासंदर्भात पोलिसांनी शाहीमार्गाची परतीच्या मार्गांची माहिती दिली. सदरचे नियोजन चांगले झाले अाहे. शाही मिरवणुकीसाठी साधूंच्या सूचना जाणून घेऊन पुढच्या बैठकीत त्या मांडल्या जातील. -महंत राजेंद्रदासजी महाराज, निर्मोही आखाडा