आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या पर्वणीसाठी नियोजनाची सिद्धता, गर्दी नियंत्रणासाठी सरकत्या बॅरिकेडिंगवर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रविवारी (दि. १३) होणाऱ्या दुसऱ्या शाही पर्वणीसाठी प्रशासनाने नियोजनाची सर्व सिद्धता केली आहे. कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीकाळात नवीन नियोजनानुसार नो एण्ट्री पाॅइंटपर्यंत दुचाकी नेता येणार आहे, तसेच कुंभमेळा क्षेत्राव्यतिरिक्त शहरात इतरत्र सरकते बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. यामुळे मागील पर्वणीत शहरवासीयांची झालेली गैरसोय टळणार आहे.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सेक्टर अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात नवीन नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या.

नव्याने केलेले भाविक मार्ग, रस्त्यांचे नियोजन, स्नानाची ठिकाणे, बॅरिकेडिंग, वाहनतळे, गर्दी कमी असताना वाहतुकीचे नियोजन, गर्दी वाढल्यास त्यात कुठल्या बाबींचा अंतर्भाव करावयाचा, काय बदल करावयाचे, सरकते बॅरिकेडिंग, शाही मिरवणुकीच्यावेळी करावयाच्या आणि वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसह प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत गर्दी नियंत्रणासाठीच्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनांत लवचिकता ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी प्रत्यक्ष संबंधित सेक्टर अधिकाऱ्यांसह कर्मचारीही आपल्या नेमणुकीच्या ठिकाणी पोहोचत सज्ज होणार आहेत. अवास्तव नियोजनामुळे निष्फळ ठरलेल्या पहिल्या पर्वणीच्या नियोजनात बदल करत पंधरा दिवसांपासून सर्वच विभागांकडून फेरनियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या पर्वणीस भाविकांची मोठी गर्दी होणार असून, गुजरातमार्गेही भाविक येण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली गेली.

कोअर परिसर : दिंडोरीनाका, मखमलाबाद नाका, अशोकस्तंभ, ज्योती बुक डेपो, टिळकवाडी सिग्नल, जलतरण तलाव, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, बागवानपुरा, ट्रॅक्टर हाऊस, संतोष टी पॉइंट, काट्या मारुती चौक येथून रामकुंड अथवा या क्षेत्राच्या आतील बाजूस राहणाऱ्या नागरिकांनी रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी राहील.

{ शहरांतर्गत बस व्यवस्था सुरू राहाणार. प्रवासनिहाय बसचे तिकीट दर लागू असतील.
{ गर्दीचा अंदाज घेऊन शहरात येणारी वाहने पार्किंगमध्ये थांबविली जातील.
{ सरकत्या बॅरिकेडिंगचा अधिक वापर. भाविकांना जास्त अंतर चालावे लागणार नाही.
{ शाही मिरवणुकीत प्रत्येक आखाड्याच्या मागे आणि पुढे रुग्णवाहिका असेल.
{ शाहीमार्गासह भाविक मार्गावर रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने. सूचना किंवा काही अपघात घडल्याखेरीज त्यांनी ठिकाणा सोडल्यास कारवाई
{ गर्दी कमी झाल्यानंतरच स्वच्छता
{ एसटी पोलिस यांनी समन्वय राखून सतत संपर्कात राहावे
{ सर्व मार्गांवर पाणी टँकर व्यवस्था
{ प्रत्येक घाटावर जीवरक्षक नेमावेत
अशी राहील शटल बससेवा

पाथर्डीगाव ते महामार्ग : (५ बस) मार्ग : विनयनगर,जॉगिंग ट्रॅक, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
गिरणारेते डोंगरे वसतिगृह : (१० बस) मार्ग : सोमेश्वर,आनंदवली
भगूरते महामार्ग : (१५ बस) मार्ग : देवळाली,वडनेर गेट, पाथर्डी फाटा, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
नाशिकरोडते महामार्ग : (५० बस) मार्ग : आंबेडकरनगर,डीजीपीनगर, वडाळागाव, वनवैभव, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
म्हसरूळते डोंगरे वसतिगृह : (५ बस) मार्ग : मेरी,आरटओ कॉर्नर, चोपडा लॉन्स
म्हाडाकॉलनी ते ईदगाह मैदान : (५ बस) मार्ग : सातपूर,मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
उत्तमनगरते ईदगाह मैदान : (५ बस) मार्ग : विजयनगर,राणा प्रताप चौक, लेखानगर, महामार्ग, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
नाशिकरोडते काठेगल्ली (५० बस) मार्ग : अशोकाटॉवर, काठेगल्ली सिग्नलमार्गे नाशिकरोड अशा एकूण १८० बस शहरांतर्गत धावणार आहेत.
शहरांतर्गत बससेवा अशी
उपेंद्रनगरते ईदगाह मैदान : (१५ बस) मार्ग : उत्तमनगर,सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
अंबडते महामार्ग : (१० बस) मार्ग : पांडवलेणी,लेखानगर, महामार्ग, सुयोग हॉस्पिटल, चांडक सर्कल, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय
शिवाजीनगरते ईदगाह मैदान : (१० बस) मार्ग : श्रमिकनगर,सातपूर, मायको सर्कल, जिल्हा रुग्णालय

येथे आहे दुचाकी पार्किंग व्यवस्था
{धुळे,औरंगाबादरोड, आडगाव : अमृतधामचौक, मिर्ची ढाबा रोडवरील दोन्ही बाजूचे रस्ते.
{ नाशिकरोडउपनगर, जयभवानीरोड, आंबेडकरनगर, देवळाली परिसर :श्री श्री रविशंकर मार्ग, अशोका स्कूलच्या समोरील मोकळे पटांगण
{ गंगापूर,सातपूर, अंबड परिसर : ईदगाहमैदान
{ इंदिरानगर,अंबड परिसर : किनाराहॉटेलमागे
{ गंगापूर,पंचवटी परिसर : डोंगरेवसतिगृह
{ पेठरोडपरिसर : शरदचंद्रपवार फळ मार्केट
{ दिंडोरीरोडपरिसर : मेरीमैदान.

दुसऱ्या पर्वणीच्या दोन दिवस आधीच शहरात भाविकांची गर्दी वाढू लागल्याने शुक्रवारी तपोवन परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकते बॅरिकेडिंग करण्यात आले.

पर्वणीकाळात हाॅटेल्स रात्री पर्यंत खुली
सिंहस्थाच्यादुसऱ्या पर्वणीकाळात भाविकांसह नागरिकांच्या सोयीसाठी १२ ते १४ सप्टेंबर या काळात हॉटेल्स रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मुंबई पोलिस अधिनियमनांतर्गत पोलिस आयुक्तांनी आपल्या अधिकारात दिली आहे. याचप्रमाणे तिसऱ्या पर्वणीकाळात १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत शहरातील सर्व हॉटेल लॉज रात्री ११.३० ते रात्री वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची अधिसूचना अटी शर्तीनुसार जारी केली. हॉटेल लॉजिंग रात्री ते पहाटे या कालावधीत चालू राहणार नाहीत. ही अधिसूचना फक्त परवानाधारकांना लागू आहे. विनापरवाना असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे.