आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकत्रित प्रयत्नांमुळेच कुंभमेळा यशस्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक-त्र्यंबकेश्वरयेथे निर्विघ्न पार पडलेला सिंहस्थ कुंभमेळा हा एकत्रित प्रयत्नांचेच यश आहे. पोलिस, जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या शाहीस्नान पर्वणीपासून केलेले उत्तम नियोजन आणि साधू-महंत भाविकांनी समजदारीची भूमिका घेत केलेल्या सहकार्यामुळेच हा जागतिक सोहळा यशस्वी झाल्याचे समाधान पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी व्यक्त केले.

ते म्हणाले, संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेला कुंभमेळा यशस्वी करून दाखवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले होते. त्यातच पहिल्या पर्वणीला पोलिसांचे चुकलेले नियोजन, काही साधू-महंतांची नाराजी यामुळे माझ्यासह प्रशासनावर मोठे दडपण होते. पण, पहिल्या पर्वणीतून धडा घेत चुकलेल्या नियोजनासाठी पोलिसांची कार्यशाळाच घेतली. खाकीचा रुबाब दाखविता ‘भाऊ-दादा, ताई-मावशी’, असे अदबीने बोला.

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात अाला. समवेत अामदार बाळासाहेब सानप, ‘दिव्य मराठी’चे जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, सुरेश पाटील, विजय साने, विक्रांत चांदवडकर अादी मान्यवर.