आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ खालशांना हटवणार नसल्याबाबत अाखाडे ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खालसे जागेवरून हटणार नाहीत, असे धार्मिक संस्थेच्या प्रतिनिधीला सुनावताना निर्वाणी अनी अाखाड्याचे महंत धरमदास महाराज. - Divya Marathi
खालसे जागेवरून हटणार नाहीत, असे धार्मिक संस्थेच्या प्रतिनिधीला सुनावताना निर्वाणी अनी अाखाड्याचे महंत धरमदास महाराज.
नाशिक - कुंभपर्वाला प्रारंभ हाेऊनदेखील प्रशासन अाणि अाखाड्यांमधील जागावाटपाचा घाेळ अद्याप संपण्याचे नाव घेत नसल्याचे चिन्ह अाहे. काही ठिकाणी प्रशासनाने याेग्य पद्धतीने मार्गदर्शन न केल्याने धार्मिक संस्थांच्या जागेत काही खालशांनी तळ ठाेकल्यावर प्रशासनाने त्यांना हटवायला माणसे पाठविल्याने वाद निर्माण झाला हाेता. त्यामुळे या खालशांनी अाखाड्यांच्या श्री महंतांकडे धाव घेतल्यावर काेणत्याही स्थितीत तळ ठाेकलेल्या सुमारे ६० खालशांना जागेवरून हटवणार नसल्याचे सांगत त्या खालशांच्या साधूंना दिलासा दिला. मात्र, त्यामुळे अाता परत संस्थांसाठी नवीन जागा शाेधण्याचा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला अाहे.
अाैरंगाबाद-टाकळी लिंकराेड भागापासून जवळच असलेल्या माेठ्या जमिनीवर प्रशासनाने काही भागात धार्मिक संस्थांसाठी तर काही भागात खालशांसाठी प्लाॅट अारक्षित केले हाेते. मात्र, खालशांना प्लाॅट वाटप करताना प्रशासनाचे संबंधित अधिकारी तिथे नसल्याने अनेक खालशांना कुठले प्लाॅट खालशांसाठी अाहेत, त्याचा नकाशातून नीटसा उलगडा झाला नाही. त्यामुळे त्यांनी तेथील बहुतांश प्लाॅटवर अापापले फलक लावून सामान अाणून टाकण्यास प्रारंभ केला. मात्र, त्यातील काही प्लाॅट हे धार्मिक संस्थांचे असल्याने त्यांनी जेव्हा संबंधित खालशांना त्याबाबत सांगितले, त्यावेळी वाद निर्माण हाेऊ लागले. चूक कुणाची त्यावरून मग अाकांडतांडव सुरू झाले. प्रशासनाने ती जमीन अाम्हाला दिली असल्याचे कागद धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी दाखवत हाेते. तर, खालशांकडून प्रशासनावर ठपका ठेवण्यात येत हाेता.

सुमारे ६० खालशांना ठेवणार जैसे थे...
अखेरीस संबंधित खालशांनी मग अाखाड्यांकडे धाव घेत काय करायचे? अशी विचारणा केली. अाता अाम्ही तळ ठाेकल्यावर पुन्हा परत उठून दुसरीकडे जायचे, असे किती वेळा करायचे, असा सवाल त्यांनी अाखाड्यांच्या श्री महंतांना केला. त्यावर निर्वाणी अनी अाखाड्याचे श्री महंत धरमदास महाराज तसेच दिगंबर अाखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज यांनी एकदा तळ ठाेकलेल्या खालशांना कुठेही हलवले जाणार नसल्याचे सांगितले. प्रशासनालादेखील याच भाषेत बसलेले खालसे कायम ठेवण्याबाबत सांगणार असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...