आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्राममधून... उनकी व्यवस्था अभी ताे लग गयी है, पर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद-दाेन खालशांचे श्री महंत वयाेमानामुळे थकलेले अाहेत. त्यामुळे कुंभस्थळी ते काहीसे उशिराने अर्थात काल, अाज दाखल झालेले असतात. काही प्रमुखांना तर हात धरल्याशिवाय चालणेदेखील शक्य नसते. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी शिष्यांची मदत घेणे अनिवार्य असते. त्यामुळे त्या खालसेप्रमुखाचा शिष्य संबंधित अाखाडेप्रमुखांकडे दिवसातून दाेन-तीनदा चक्कर मारतात. महंतजी हमारे महाराजजी पुछ रहे है, अपने खालसे का क्या हुवा? त्यावर मग संबंधित अाखाडाप्रमुख त्याला जागावाटपाबाबत हाेत असलेल्या घाेळाची माहिती देतात. मग ताे म्हणताे, पण अामच्या महाराजांना काय सांगू? त्यांनी तर अाल्या क्षणापासून प्लाॅटवर घेऊन चल, असा धाेशा लावला अाहे. मग ताे महंत सांगताे, त्यांची जेवणाखाणाची व्यवस्था तर ठीक झालेली अाहे ना? स्थानिक अाखाड्यामध्ये त्यांना काही त्रास तर नाही ना? मग ताे शिष्य सांगताे ‘नही महंतजी, अभी ताे उनकी व्यवस्था लग गयी है, पर... वाे अाप बाेले थे ना... अाज मिल जायेगी प्लाॅट की जगह... मग त्यावर श्री महंत त्याची कशीबशी समजूत काढतात. तरीदेखील ताे जागेवरून हटायला तयार नसताे, असे त्यांच्या लक्षात अाल्यावर त्याला उद्यापर्यंत काम नक्की हाेऊन जाईल, असे समजावून सांगतात.
बातम्या आणखी आहेत...