आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुशावर्तावर ५० फुटांच्या आत पोलिस बंदोबस्त नको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- पहिल्यापर्वणीप्रसंगी आलेल्या कटू अनुभवांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषद आक्रमक झाली आहे. परिषदेने सोमवारी बैठक घेऊन शाहीस्नानाची वेळ वाढवून मिळावी, स्नानात सहभागी होणाऱ्यांना त्रास होता कामा नये, तसेच कुशावर्तापासून ५० फुटांच्या आत पोलिस बंदोबस्त नसावा, असे महत्त्वपूर्ण ठराव केले. प्रशासनाने या मागण्यांना लिखित मान्यता दिल्यास १३ सप्टेंबरच्या पर्वणीत फक्त इष्टदेवतांचे शाहीस्नान केले जाईल, साधू-महंत स्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा देण्यात आला आहे.

येथील नील पर्वतावरील जुना आखाड्याच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता ही बैठक झाली. त्यास आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, षड‌्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती, जुना आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज यांच्यासह इतर आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी, पहिल्या शाहीस्नानप्रसंगी साधू-महंतां१ची पोलिसांकडून अडवणूक झाली. कुंडातून बाहेर काढताना ढकलाढकली याविषयी नाराजी व्यक्त झाली. दोनशे वर्षांपासून अआखाड्यांना शाहीस्नानासाठी अर्धा तास दिला जातो आहे. पूर्वी साधूंची संख्या मर्यादित होती. आज त्यात वाढ झाली आहे. परिणामी स्नानास अर्धा तास कमी पडतो. त्यामुळे स्नानास एक तास देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

त्याचबरोबर शाहीस्नान हे साधूसमाज भाविकांचे असते त्यात पोलिसांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. साधू कायदे पाळतात, मग पोलिसांनीही मर्यादा पाळाव्या. त्यासाठी बंदोबस्त कुशावर्तापासून ५० फूट लांब लावावा, अन्यथा दुसऱ्या पर्वणीला फक्त देवतांना स्नान घालून साधू-महंत शाहीस्नानावर बहिष्कार टाकतील, असा एकमुखी निर्णय या वेळी घेण्यात
आला.

या प्रसंगी आनंद आखाड्याचे श्रीमहंत धनराजगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती, महंत केशवानंद महाराज, निरंजनी आखाड्याचे श्रीमहंत रामानंदपुरी, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रमेशपुरी महाराज, शिवनारायणपुरी, बडा उदासीन आखाड्याचे प्रेमानंद उदासीन, नया उदासीन आखाड्याचे श्रीमहंत कर्तारमुनी, निर्मल आखाड्याचे श्री राजेंद्र सिंह उपस्थित होते.

त्र्यंबकमधील आखाडा परिषदेच्या बैठकीत ठराव
साधू-महंतभाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता कुशावर्तावरील व्यवस्थेत अामूलाग्र बदल करण्याची गरज आहे. शाहीस्नानाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची प्रशासनाने व्यवस्था करावी. कुशावर्तात प्रसाधनगृहाचे पाणी येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच अाखाड्यातील शिष्यांना त्यांच्या वाहनांसह प्रवेश द्यावा, पहिल्या पर्वणीतील त्रुटी दूर कराव्यात, असे ठरावही या वेळी करण्यात आले. सदरचे ठराव प्रशासनाला पाठविले जाणार आहेत.

त्र्यंबकेश्वर : येथीलजुना आखाड्यातील बैठकीला उपस्थित अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, स्वामी सागरानंद सरस्वती, महामंत्री हरिगिरी महाराज यांसह इतर साधू-महंत.