आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळा: भक्तीचा असाही मांडला जाताेय बाजार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या दक्षिणेला गोदावरी तटावर फाशीच्या आंब्यालगत महादेवाचे जीर्ण मंदिर असून, त्यात शिवपिंड आहे. त्याच्या सभोवताली दररोज पावाच्या लाद्या ठेवल्या जात आहे. या पावाच्या लाद्या पाहून काही भाविकही या पिंडीला पावाचा नैवेद्य वाहत आहे.

गौतमी तलावातील माशांना पाव टाकल्यामुळे मोठे पुण्य लाभते, अशी धारणा तयार झाली आहे. मात्र, तलावावर पाव ठेवण्याऐवजी मंदिरात सुरक्षित ठेवले तर देवाला नैवेद्य होईल व पावाचे पैसेही मिळतील, असे दुहेरी गणित त्यामागे संबंधितांनी तयार केले आहे. देवाला पावाचा नैवेद्य लागतो, अशी प्रसिद्धी होऊन तेथे काही दिवसांत बेकरी उभी राहील. त्याचबराेबर काही लाेक मंिदरातील पाव घेऊन तलावाबाहेर उभे राहून विक्री करत असल्याने त्यांचाही व्यवसाय तेजीत अाला अाहे.
पुढील स्लाइडमध्ये, कपडे सांभाळण्यासाठी द्या फक्त दहा रुपये...
बातम्या आणखी आहेत...