आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घरवापसी’ प्रक्रिया कुंभातच नव्हे, तर सदोदित चालावी, गोरखपूरचे भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हिंदूधर्मातील ‘भूले, बिछडे’ पुन्हा धर्मात परतू इच्छित असतील तर त्यांचे धर्मात पुन्हा स्वागत झालेच पाहजिे. त्यामुळे ‘घरवापसी’ ही केवळ कुंभमेळ्यात चालणारी प्रक्रिया राहता त्यात सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मातील अस्पृश्यता आणि जातीयवाद संपुष्टात आणून प्रत्येकाला एका धर्मसूत्रात बांधणे हे देश आणि धर्महिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे मत गोरखपूर येथील भाजपचे खासदार आणि नाथपंथी योगी आदित्यनाथ यांनी ‘दवि्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. त्र्यंबकेश्वरमधील नाथपंथी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशकात आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हिंदू धर्मातील जातीभेदासह सर्व अनिष्ट प्रथा दूर केल्यास हिंदू धर्मीय एकसंघ होतील. त्यासाठी सर्व साधू-संत, महंतांनी त्यासाठी प्रयास करणे आवश्यक बनले आहे. आपल्या घरातदेखील काही गळती असेल तर ती आपण बंद करतोच. त्याचप्रमाणे धर्माच्या प्रवाहातील ‘लिकेज’ रोखणे प्रत्येक हिंदू धर्मीयाचे कर्तव्यच आहे. म्हणूनच कुणी धर्मात परतू इच्छित असतील तर त्यांचेदेखील स्वागत झालेच पाहजिे. हिंदू धर्मात अनेकपंथ आणि त्याहून अधिक उपासना पद्धती आहेत. त्या सगळ्यांचे मार्ग विभिन्न असले तरी धर्म एकच असल्याचे सूत्र सदैव लक्षात ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.

धार्मिक सत्ताच सर्वश्रेष्ठ
नाशिकमधील कुंभमेळ्यानिमित्त पालकमंत्री आणि साधू-महंतांमध्ये काही वादवविाद झाले असल्यास त्याबाबत मला माहिती नाही. मात्र, धर्मसत्तेचा मानसन्मान राखणे हे सरकारचे, लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. कारण धर्मसत्ता हीच सर्वश्रेष्ठ असून, साधू - संत हे कोणत्याही अनुशासनाच्या कक्षेत बसत नाहीत. त्यांना तुम्ही एकाच परिघात बांधून ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये शासन, प्रशासनाचा हस्तक्षेप नको, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.