आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजाराेहणावरून महासभा तापणार, मनसेची लक्षवेधी ; माकपसह राष्ट्रवादी विचारणार जाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्याचा प्रारंभ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या ध्वजाराेहण साेहळ्यात यजमान असलेल्या महापालिकेच्या नगरसेवकांनाच प्रवेशबंदी केल्याच्या मुद्यावरून घडलेल्या मानापमान नाट्याचा पुढील अंक शुक्रवारी (दि. १७) हाेणाऱ्या महासभेत रंगणार असून, मनसेचे नगरसेवक सुदाम काेंबडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून या प्रकरणाला जबाबदार काेण, यावर चर्चा घडविण्यासाठी पत्र िदले अाहे. त्यास राष्ट्रवादी माकपच्या नगरसेवकांकडून समर्थन मिळण्याची चिन्हे अाहेत.

सिंहस्थ ध्वजाराेहण साेहळा मंगळवारी (दि. १४) भाजीबाजार पटांगणावर झाला. या वेळी कडेकाेट पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. मुख्यमंत्र्यापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांची उपस्थिती असल्यामुळे पाेलिसांनी प्राेटाेकाॅल सुरक्षेचा बाऊ करून शक्य तितक्या लाेकांना अटकाव करण्याचे धाेरण स्वीकारले हाेते. त्याचा फटका महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांपासून नगरसेवकांनाही बसला हाेता. गेल्या दाेन वर्षांपासून सिंहस्थ कामांसाठी राबणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सभा मंडपाच्या मागे खूर्ची टाकून बसण्याची वेळ अाली हाेती. विशेष म्हणजे, सर्व कार्यक्रमावर भारतीय जनता पक्षाचे प्रभुत्व असल्याचे अाराेप झाले असले, तरी भाजपचे नगरसेवक स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही हातावर हात धरून बसण्याची वेळ अाली हाेती. या मानापमानावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाेलिस अधिकाऱ्यांना जागेवरच जाब विचारत धारेवर धरले हाेते. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी िदलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र, अाता हा मुद्दा साेडला, तर पाेलिसांकडून पुन्हा महत्त्वाच्या शाही पर्वण्यांनाही दुय्यम वागणूक मिळेल या भीतीने नगरसेवकांनी महासभेत जाब विचारण्याची तयारी केली अाहे. सत्ताधारी पक्षाचे िजल्हाध्यक्ष तथा नगरसेवक काेंबडे यांनी लक्षवेधी पत्राद्वारे या मुद्यावरून चर्चा घडवण्याची मागणी केली अाहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी, काँग्रेस माकपचे नगरसेवकही अाक्रमक हाेणार अाहेत.

सर्वच नगरसेवकांना विशेष निमंत्रितांचे पास
दरम्यान,या मुद्यावरून महापाैर अशाेक मुर्तडक, उपमहापाैर गुरमित बग्गा, सभागृह नेते सलीम शेख, मनसे गटनेता अनिल मटाले, महानगरप्रमुख तथा नगरसेवक राहुल ढिकले, यशवंत निकुळे, अशाेक सातभाई, दीपाली कुलकर्णी, नामदेव पाटील अादी मनसेच्या नगरसेवकांनी पाेलिस अायुक्त जगन्नाथन यांची भेट घेऊन ध्वजाराेहण साेहळ्याप्रसंगी झालेल्या मानापमान नाट्याची बाब दुर्दैवी असल्याची कैफियत मांडली. त्यावर पाेलिस अायुक्तांनी दिलगिरी व्यक्त करीत शाहीस्नानाच्या पर्वणीच्या वेळी गैरसाेय हाेणार नाही, अशी ग्वाही िदली. या वेळी नगरसेवकांना महापालिका पाेलिस अायुक्तालयाने समन्वय साधून विशेष पास द्यावेत, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाही स्वतंत्र पास द्यावेत, अशी सूचना महापाैर उपमहापाैरांनी केली. गाेदाघाटावर कार्यरत स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिकांबाबत याेग्य ताे निर्णय घेण्याची सूचनाही करण्यात अाली. त्यावर अायुक्तांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला.

चर्चेतून साध्य काय हाेणार?
मुळातमहासभेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावरून चर्चा करून नगरसेवक साध्य काय करणार, असा प्रश्न अाहे. पाेलिसांवर कारवाईचे अधिकार महासभेला नाहीत वा विशेष निमंत्रितांची यादी पाठवणाऱ्या पुराेहित संघासारख्या यजमानांची क्षणभर चूक असेल, तर त्यांच्याही नावाने खडे फाेडण्याशिवाय अन्य पर्यायच नाही. अशा परिस्थितीत या मुद्यावर अाता नगरसेवक िकती वेळ घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले अाहे.
बातम्या आणखी आहेत...