आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा उद्यापासून; अडीच महिन्यांत ८ कोटी भाविक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकचा कुंभमेळा मंगळवारपासून सुरू होत आहे. १४ जुलैला सकाळी ६.१७ वाजता ध्वजारोहणाने सुरुवात होईल. आधी त्र्यंबकेश्वरला नंतर नाशकात ध्वज फडकेल. पंतप्रधान मोदीही येऊ शकतात. कुंभमेळा २५ सप्टेंबरपर्यंत चालेल. या अडीच महिन्यांत ८ कोटी भाविक येतील.

नवीन साधुग्राम शहर वसवले
{सर्व १० आखाड्यांसाठी नवी इमारत
{ २५ हजार गॅस जोडण्या
{३९ हजार शौचालये
{ ७१४ एकरांत २० पार्किंग व्यवस्था
{५५० सीसीटीव्ही, १५ हजार जवान व २० हजार स्वयंसेवक सुरक्षेसाठी.

चार शाही स्नान २९ ऑगस्ट व १३ सप्टेंबर : नाशिक व त्र्यंबकेश्वरला {१८ सप्टेंबर : नाशिकला {२५ सप्टेंबर : त्र्यंबकला

273 वर्षे जुनी परंपरा: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नाशिकला जाऊन संतांना उज्जैन सिंहस्थाचे निमंत्रण देतील. सिंहस्थ महाकुंभ २२ एप्रिल २०१६ पासून सुरू होईल. २७३ वर्षांपूर्वी त्या वेळचे शासक राणोजी शिंदे निमंत्रण देण्यासाठी नाशिकला गेले होते. तेव्हापासून ही परंपरा आहे.
१२ वर्षांनंतर उघडेल गंगा मंदिर रामकुंडाजवळील या मंदिराची दारे मंगळवारी उघडतील. २०१६ मध्ये १५ ऑगस्टला ती पुन्हा बंद होतील.