आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूचा धाक दाखवून दागिने लांबविले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव: ‘मॅडम, सर आहेत का घरात? आम्ही मैत्रेय ग्रुपचे काम करतो’, असे म्हणत ते घरात घुसले, त्यानंतर महिलेला चाकूचा धाक दाखवत एक लाख रुपयाचे दागिने चोरट्यांनी सकाळी आठ वाजताच चोरून नेल्याची घटना शनिवारी लासलगाव येथे घडली.
कृषिनगर येथे भगवान कुमावत यांचा बंगला आहे. ते गोंदेगाव जिल्हा परिषद शाळेत नोकरीस आहेत. त्यांची पत्नी संगीता कुमावत यादेखील आरोग्यसेविका म्हणून पाटोदा येथे कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी कुमावत सर शाळेत गेले, त्याच वेळेस दोन अज्ञात इसम दुचाकीवर त्यांच्या घराजवळ आले. घराचा दरवाजा ठोठावल्यानंतर सौ. कुमावत यांनी कोण पाहिजे? असे विचारले त्यावेळी समोरील अज्ञात दोघांनी ‘मॅडम आम्ही सरांना भेटायला आलो आहोत’, असे म्हणून ते घरात घुसले त्यानंतर एकाने सौ. कु मावत यांचे तोंड दाबले व दुसर्‍याने त्यांच्या मानेवर चाकू लावला. त्यानंतर ओढणीने त्यांचे हात पाठीमागे बांधले. त्यानंतर त्यांच्या गळ्य़ातील तीन तोळे सोन्याची पोत, पाच ग्रॅम कानातले दागिने, एक तोळ्याच्या दोन अंगठय़ा व रोख रक्कम आठशे रुपये घेतले. त्यानंतर त्यांना घरातील स्वच्छतागृहात कोंडून घराचा दरवाजा बंद करून त्या चोरट्यांनी पोबारा केला.