आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी न भरल्यास कारवाईची काठी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणार्‍या व्यापारी, उद्योजकांवर कारवाईची तयारी महापालिकेच्या प्रशासनाने पूर्ण केली आहे. जकातीच्या तुलनेत एलबीटी कररचनेतून खूपच कमी करवसुली होत असल्याने सध्या महापालिका आर्थिक कोंडीत सापडली आहे. यामुळेच महापालिकेने कारवाईचे पाऊल उचलले आहे.

21 मेपासून जकातीची जागा स्थानिक संस्था कराने घेतली. मात्र, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्ये आठ कोटी, तर जूनमध्ये केवळ 40 कोटींची वसुली झाल्याने महापालिकेपुढे आर्थिक संकट उभे राहिले. जकातीच्या माध्यमातून किमान 70 ते 75 कोटींची वसुली दोन महिन्यांमध्ये होत असे. त्या तुलनेत एलबीटीची वसुली अत्यंत तुटपुंजी होत असल्याने आता महापालिकेने कर न भरणार्‍यांविरुद्ध कारवाईसाठी मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला असून, त्यास आयुक्त संजय खंदारे यांनीही दुजोरा दिला आहे.

यापूर्वी जकात भरणारे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक सध्या एलबीटी भरत नसतील तर त्यांचा शोध घेऊन ही कारवाई होणार आहे. वसुली पुरेशी होत नसली तरी आयुक्तांनी मात्र येत्या दोन-तीन महिन्यांत होणारी आर्थिक तूट भरून निघण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या मार्गाने तरी पालिकेची स्थिती सुधारेल का, याची उत्सुकता आहे.