आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी विरोधकांनी सिली सत्तांतराची हाक; सोशल मीडियावर प्रचाराचा जोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सत्तापरिवर्तनासाठी जनतेला साद घालण्यास सोशल मीडियावर सुरुवात झाली आहे.

राजकीय पक्षाचे जागावाटप, उमेदवारी जाहीर होण्याआधीच ‘योग्य माणसाची निवड करा, एलबीटीला विसरू नका’ असा संदेश एकमेकांपर्यंत पोहोचविण्याचे काम व्यापारी संघटनांनी सुरू केले असून, व्हॅट्सअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांनी कोणता कर आकारायचा, याचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात टाकून यातून अंग काढून घेतल्याने व्यापारी संघटना खवळल्या होत्या. येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखविण्याची शपथच या संघटनांनी मागील महिन्यात मुंबईतील बैठकीत घेतली होती.