आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक येथील एकाच कुटंबातील तिघांचा अपघातात मृत्‍यू, पती-पत्‍नीसह मुलगा जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मध्यप्रदेशात सेंधवा जवळ झालेल्या कंटेनर व रीक्षाच्या भीषण अपघातात नाशिक येथील पती- पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. काल बुधवारी 4 वाजेच्‍या सुमारास हा अपघात झाला. अहिरे असे या दुर्दैवी कुटुंबाचे नाव असून ते नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता. सटाणा) येथील रहिवाशी आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत झाल्‍याने नामपूर गावावर शोककळा पसरली आहे.


क्रेनने काढावे लागले मृतदेह बाहेर
सोमनाथ वेदुजी अहिरे आपल्‍या पत्‍नी ताराबाई आणि मुलगा नरेंद्रसोबत मध्‍यप्रदेशातील खडकीय येथे एका आयुर्वेदीक दवाखान्यात उपचारासाठी जात होते. सेंधव्‍याजवळ ए.बी रोडवर मुंबईहून इंदुरकडे जाणार्‍या कंटेनरने (क्र.आर.जे.14 जीजी-4618) त्‍यांच्‍या रिक्षाला (क्र.एम.पी. 45-0237) जोरदार धडक दिली. रिक्षा कंटेनरखाली दबल्‍या गेल्‍याने या कटुंबाचा जागीच अंत झाला. तिघांचे मृतदेह क्रेनने बाहेर काढावे लागले. रिक्षाचालक आरिफ युसूफ हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे.  

 

एकुलता एक मुलगा होता नरेंद्र

दोघे पती-पत्नी टेलर काम करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना चार मुली असून त्या सर्व विवाहित आहेत. अपघातात मृत्‍यू झालेला नरेंद्र हा या दाम्‍पत्‍याचा एकुलता एक मुलगा होता. हे तिघे खाजगी बसने प्रथम शेंदवा येथे गेले होते. तिथून भाड्याने  रिक्षा करून जवळच असलेल्या खडकीय येथे ते जात होते.  तेव्‍हाच काळाने त्‍यांच्‍यावर ही झडप घातली.
 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कुटुंबाचे आणि अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...