आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅट्रॉसिटी कायदा कठोर करण्याची मागणी, लाखाेंच्या शांती माेर्चातून निळ्या वादळाचा हुंकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करावा, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी निघालेल्या बहुजन शांती महामोर्चात नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपासूनच बिटको चौकात बहुजन समाजबांधवांची गर्दी दिसत होती.

महामोर्चासाठी नाशिक रोड, जेल रोड, गोरेवाडी, सिन्नर फाटा, विहीतगाव, देवळाली गाव राजवाडा, देवळाली कॅम्प, भगूर व लहवीत या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. मोर्चात महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. महिलांसह युवतींनी निळा फेटा, सफेद साडी परिधान केलेली होती. तर, युवकांनी गळ्यात निळा शेला, डोक्याला फेटा व हाती निळा ध्वज हाती घेतलेला होता. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना स्थानिक मोर्चेकऱ्यांनी पिण्याचे पाणी, नाष्टा उपलब्ध करून दिला होता. त्याचप्रमाणे प्रत्येक दुचाकी, चारचाकी आणि बसेसवर निळे ध्वज लावण्यात आले होते.

देवळाली कॅम्प, भगूर, विहीतगाव, देवळाली गाव राजवाडा या भागातून, जेल रोड, गोरेवाडी, सिन्नर फाटा, शिंदे, पळसे, सिन्नर या भागातूनही मोर्चेकऱ्यांची वाहने येत होती. बहुतांश मोर्चेकरी पायी येत असल्याने बिटको चौकात वाहतूक कोंडी झाली होती. मोर्चेकरीच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेत होते. काही युवक ज्येष्ठांना वाट मोकळी करून देत होते. कोणतेही नेतृत्व नाही, कोणताही खर्च नाही, कोणताही अतिरेक नाही, फक्त बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत युवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाकडे रवाना होत होते. तर, देवळाली कॅम्प, भगूर, विहीतगाव, वडनेर, देवळाली गाव, जेल रोड, सिन्नर फाटा, गोरेवाडी, उपनगर व भीमनगर या भागातून युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात होते. युवती बाबासाहेबांचे गीत गाऊन मोर्चेकऱ्यांना प्रोत्साहन देत होत्या. दलित समाजासोबत मुस्लिम समाजातील युवकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यातील काही युवक वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करत होते.
बोलो बोलो जय भीम....
बोलो बोलो जय भीम... एकच साहेब बाबासाहेब... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो... आप भी देखो आँखों से, हम भी आये हैं लाखों से.... अशा गगनभेदी घोषणा देत नाशिक रोड येथून युवक निघाले होते. त्यानंतर ते नाशिक शहरातील महामोर्चामध्ये सहभागी झाले.
बातम्या आणखी आहेत...