आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय गटनेते एसपीव्ही विराेधीच, महापाैरांनी बाेलावली पुन्हा अाज बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - करवाढीच्या निर्णयाचे अधिकार अापल्याकडे ठेवणाऱ्या स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही)ला भाजप वगळता सर्वपक्षीय गटनेत्यांनी रविवारीही (दि. १३) विराेध दर्शविला. महापाैरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत अायुक्तांनी एसपीव्ही किती गरजेचे अाहे, या विषयीचे सादरीकरण केले. दरम्यान, साेमवारी (दि. १४) पुन्हा एकदा एसपीव्हीच्या प्रस्तावावर महापाैरांनी गटनेत्यांची बैठक बाेलावली अाहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश हाेण्यासाठी देशभरातील शहरांचा गेल्या महिन्यापर्यंत प्रयत्न सुरू हाेता. परंतु, स्मार्ट सिटीच्या निकषांमध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या एसपीव्हीचे स्वरूप सदस्यांना अाताशी समजल्यामुळे त्यास सर्व पातळ्यांवरून विराेध सुरू झाला अाहे. एसपीव्ही म्हणजे महापालिकेच्या स्वायत्ततेवरच घाला अाहे, असे ठाम मत नगरसेवकांचे झाल्यावर त्यांनी महासभेतही एसपीव्हीला विराेध दर्शविला. महासभेतही एसपीव्हीच्या प्रस्तावावर दीर्घकाळ चर्चा चालली. मात्र, भाजप वगळता सर्वच पक्षांनी विराेधाची भूमिका घेतल्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात अाला. त्यानंतरही अायुक्त अाणि भाजपच्या नगरसेवकांनी एसपीव्हीसाठी अाग्रही भूमिका घेतल्याने अखेर रविवारच्या सुटीच्या दिवशी महापाैरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी गटनेत्यांची पुन्हा एकदा बैठक घेण्यात अाली. त्यात अायुक्तांनी एसपीव्हीचे महत्त्व विशद करतानाच त्यातील महत्त्वाच्या मुद्यांचे सादरीकरण केले.
महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भाजप वगळता सर्वच गटनेत्यांनी विराेध दर्शविला. एसपीव्हीच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर करवाढीचा वरवंटा फिरवला जाण्याची दाट शक्यता असून, महापालिकेचीही स्वायत्तता या प्रस्तावामुळे धाेक्यात येणार अाहे, असे गटनेत्यांनी यावेळी सांगितले. साेमवारी (दि. १४) पुन्हा एकदा या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महापाैरांनी गटनेत्यांची बैठक अायाेजित केली अाहे.

गटनेते देणार विराेधाचे पत्र
एसपीव्हीला विराेध झाल्यानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांनी अापापल्या भूमिकांविषयीचे पत्र महापाैरांना सादर करावयाचे अाहे. हे पत्र महासभेच्या ठरावासाेबत जाेडून ताे ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला.

वरिष्ठांच्या अादेशानंतर सेनेची भूमिका हाेणार निश्चित
एसपीव्हीच्याप्रस्तावाच्या समर्थनार्थ भाजपने भूमिका घेतली अाहे. शिवसेनेने मात्र अद्याप अापली अंतिम भूमिका निश्चित केलेली नाही. वरिष्ठांच्या अादेशानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल, असे सेनेचे गटनेते तथा महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...