आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांच्या मर्सिडीजला हवाय लकी ‘9’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मर्सिडीज घेतल्याची चर्चा सर्वतोमुखी असून, लकी 9 या क्रमांकासाठी ते आग्रही आहेत. मात्र, प्रादेशिक परिवहन कार्यालयातून हा क्रमांक मिळवण्यासाठी याआधीच अनेक जण रांगेत असल्याने उत्सुकता आहे.
महापौरांसाठी महापालिकेची इरटिगा ही कार आहे. मध्यंतरी हे वाहन दुरुस्तीसाठी जमा करण्यात आल्याने महापौरांच्या दारी अचानक मर्सिडीज गाडी आली. चर्चा रंगल्याने महापौरांनी मर्सिडीज मित्राची असल्याचे सांगत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकटवर्तीयांनीच मर्सिडीज महापौरांचीच असल्याचे सांगितले असून, वाहनाची नोंदणीही झाल्याची माहिती दिली. 9 क्रमांकासाठी आरटीओकडे दीड लाखांपर्यंत लिलाव गेला आहे. महापौरांकडील इरटिगा या कारचा क्रमांक एमएच 15 एए- 3303 असा आहे. त्याची बेरीजही नऊ अशीच होते.
काय आहे 9 नंबर - नऊ मेष आणि वृश्चिक राशींसाठी लकी समजला जातो. साहस आणि प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारा हा क्रमांक समाजात मान, सन्मान, लोकप्रियता मिळवून प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी भाग्यशाली ठरतो. तुषार तरटे, ज्योतिष व अंकशास्त्रतज्ज्ञ