आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर महापाैर साधणार नगरसेवकांशी संवाद, प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही भाजपची वाटचाल मागील सत्ताधारी मनसेप्रमाणे असल्याची बाब लक्षात अाल्यानंतर जाहीरपणे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी खरडपट्टी काढल्याने अखेर महापाैर रंजना भानसी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांशी हितगुज साधून त्यांच्या समस्या निवारणासाठी प्रभागनिहाय बैठका अायाेजित केल्या अाहेत. प्रभागच नव्हे तर विषय समित्यांच्याही बैठका हाेणार असून ११ सप्टेंबरपासून तीन दिवस बैठका हाेतील.
 
मुख्यमंत्र्यांनी ‘दत्तक नाशिक’ची साद घातल्यानंतर त्यास भरभरून प्रतिसाद देत नाशिककरांनी भाजपला स्पष्ट बहुमताद्वारे सत्ता दिली. त्यानंतर भाजपविषयी अपेक्षा वाढल्या हाेता; मात्र सुरुवातीचे सात महिने केवळ भाजपतील अंतर्गत वादात गेले. महापाैर सभागृहनेते यांच्या समांतर सत्ताकेंद्रांत नगरसेवकांची घुसमट हाेत हाेती. त्यातून अधिकाऱ्यांची काेंडी झाली. माध्यमात बरीच टीका झाल्यानंतर अखेर पालकमंत्र्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी संघटनेत लक्ष घालून नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेण्याचे अादेश पदाधिकाऱ्यांना दिले अाहेत. त्यानुसार महापाैर भानसी, उपमहापाैर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील गटनेते संभाजी माेरूस्कर यांच्या उपस्थितीत विषय समिती पदाधिकारी प्रभाग समिती सभापतींसह नगरसेवकांच्या बैठका हाेणार अाहेत. 
 
उपमहापाैरही नाराज 
नवखेअसलेले उपमहापाैर प्रथमेश गिते यांना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याची तक्रार केली जात अाहे. मुळात, त्यांची नियुक्ती करण्यामागे युवा पदाधिकाऱ्यांना कामकाज समजावे असा उद्देश हाेता; मात्र महापाैरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे त्यांना निराेपच मिळत नसल्याची तक्रार अाहे. यासंदर्भात त्यांनी थेट पालकमंत्र्यांकडे तक्रारी केल्याचे वृत्त असून त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना गिते यांना सन्मानाने बैठकीत सामावून घेण्याचे अादेश दिल्याचे समजते.
 
अशा हाेतील बैठका 
याबैठकीत प्रामुख्याने ११ सप्टेंबरला महिला बालकल्याण, विधी समिती, शहर सुधार, अाराेग्य समिती सभापती, उपसभापती यांच्याबराेबर पाचही पदाधिकारी बैठका घेतील. त्यात त्यांचे प्रश्न, निधीबाबत अडचणी जाणून घेतील. त्यानंतर १२ सप्टेंबरला सातपूर, सिडकाे त्यानंतर नाशिकराेड प्रभागाच्या बैठका हाेतील. १३ सप्टेंबरला पंचवटी, नाशिक पूर्व पश्चिम विभागाच्या बैठका हाेतील. 
बातम्या आणखी आहेत...