आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए कॅप राउंडचा आज अखेरचा दिवस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एमबीए कॅप राऊंड सुरु होऊन जवळपास सहा दिवस उलटून गेलेत. शहरातील तीन्ही एआरसी सेंटर मिळून कागदपत्र तपासणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा सातशेपेक्षा कमी असल्याने यंदा विद्यार्थ्यांचा या शाखेकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निम्म्या जागा रिक्तच राहण्याची शक्यता आहे. परंतु बुधवारी (12 जून )एआरसीसाठी अंतिम मुदत असल्याने त्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता केंद्र समन्वयकांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची सुविधा पंधरा महाविद्यालयांमध्ये असून जवळपास दिड हजार जागा आहेत. त्यासाठी मागील वर्षापर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येत होते. शिवाय एआरसीची सुविधा नाशकात केवळ जेडीसी बिटको महाविद्यालयातच असल्याने तेथे प्रचंड गर्दी होत होती. यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिकमध्ये तीन महाविद्यालयांमध्ये एआरसी प्रक्रीयेची सुविधा उपलब्ध केली. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने कपात झाली.

646 विद्यार्थ्यांची नोंद
> जेडीसी बिटको मध्ये मंगळवारी 157 विद्यार्थ्यांनी नोंद केली असून, एकुण 444 विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.
> एमईटी महाविद्यालयात आतापर्यंत 50 विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे.
> एमव्हीपी महाविद्यालयात मंगळवारपर्यंत 152 विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली.

आज गर्दी शक्य
यंदा विद्यार्थ्यांचा कल कमी असला तरीही बुधवारी शेवटचा दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शासनास संकेतस्थळ रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची विनंती केली जाईल. मागील वर्षी रात्री 2 वाजेपर्यंत कामकाज सुरु होते.
-मुकुंद येवलेकर, समन्वयक, जेडीसी बिटको महाविद्यालय