आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नामकाे’तून प्रशासकांना हटविण्याचा ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक मर्चंट्स काे. अाॅपरेटिव्ह बँक लि. (नामकाे)मध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक नेमलेले असतानाही एनपीएचे प्रमाण ९.८६ टक्के असल्याच्या मुद्दावरून सभासदांनी एकच गाेंधळ घालत प्रशासक जे. बी. भाेरीया यांची नेमणूक त्वरित रद्द करण्याचा ठराव करत हा ठराव रिझर्व्ह बंँकेच्या मुख्य सरव्यवस्थापकांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
बँकेची ५७ वी सर्वसाधारण वार्षिक सभा शनिवारी बँकेच्या सातपूर येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या अावारात घेण्यात अाली. सभेच्या प्रारंभापासूनच प्रशासकांच्या विराेधात वातावरण निर्मिती झाली हाेती. प्रशासक भाेरीया यांनी चालू वर्षातील बँकेच्या प्रगतीचा अाढावा घेताना ३१ मार्च २०१६ पर्यंत बँकेस ६१ काेटी ९२ लाख रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले. तसेच, बँकेला नामकाे बँक करण्यास सरकारने परवानगी दिल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे बँकेचा व्यवहार संक्षिप्त नावाने हाेण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. तसेच, श्रीरामपूर पीपल्स काे. अाॅप. लि. बँकेच्या सेवकांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम निर्लेखित करण्याच्या विषयावर सभासदांनी प्रशासकांना जाब विचारत गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. हेमंत धात्रक, विजय साने, प्रसाद सबनीस, विजय बाेरा, माधवराव भणगे, शिराेडे अादींनी विविध विषयांवर प्रशासकांना धारेवर धरत तीन वर्षांच्या काळापर्यंत एखाद्या बँकेवर प्रशासक असल्याचे एेकिवात नसल्याचे सांगून बंँकेची निवडणूक घेऊन लाेकशाही पद्धतीने कारभार करण्याची मागणी लावून धरली. तसेच अाॅडिटर बदलण्याचा श्रीरामपूर पीपल्स बँकेचा खटला पुन्हा चालविण्याचा निर्णय घेण्यात अाला. व्यासपीठावर प्रशासक जे. बी. भाेरीया यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. अाहिरे, सहायक सरव्यवस्थापक अमृता साठे मुख्य लेखापाल संघमित्रा काळे उपस्थित हाेते. सभेस कांतीलाल जैन, शाेभा छाजेड, रजनी जातेगावकर, जयप्रकाश जातेगावकर, प्रफुल्ल संचेती, भानुदास चाैधरी, सुभाष नहार, उदयकुमार साेनवणे, पंजाबराव देशमुख, अमाेल इघे, मुन्ना तुपे, अजिंक्य साने, स्वप्निल पाटील, अभिजित शिंदे अादींसह सभासद माजी संचालक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
{ बँकेचा एनपीए दर ९.८६ टक्के.
{ धर्मादाय निधीतून ३८ लाख रुपयांची रक्कम रिझर्व्ह बँकेच्या फंडात वर्ग
{ मुख्यमंत्री सहायता निधीत ११ लाखांची मदत.
{ बंँकेच्या दाेन माजी संचालकांच्या परिचित थकबाकीदारांकडे ४२ काेटींची थकबाकी असल्याने वाढले एनपीएचे प्रमाण.
{ माजी संचालक प्रसाद सबनीस यांना ध्वनिक्षेपक दिल्यामुळे त्यांच्यात कर्मचाऱ्यांत झालेल्या वादामुळे काही काळ निर्माण झाले तणावाचे वातावरण.
बातम्या आणखी आहेत...