आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर यतीन वाघांच्या बंधूसह दोघांना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ओम बजरंग रिक्षा संघटनेचा मोहन चांगले व दीपक सोनवणे यांच्या खूनप्रकरणी अखेर नाशिकचे महापौर अँड. यतिन वाघ यांचे मोठे बंधू राजेंद्र ऊर्फ दादा वाघ व संशयित व्यंकटेश ऊर्फ व्यंक्या मोरे यांना पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी स्वतंत्रे पथके रवाना करण्यात आली आहेत.

नाशकातील हॉटेल विसावा येथे मंगळवारी रात्री चांगले व सोनवणे यांच्यावर सशस्त्र टोळक्याने हल्ला केला होता. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर चांगले यांच्या सर्मथकांनी वाहनांची तोडफोड आणि जबरदस्तीने बाजारपेठ बंद पाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. चांगले याचे बंधू रामदास याच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस ठाण्यात महापौरांचे बंधू राजेंद्र वाघ याच्यासह कुख्यात गुन्हेगार अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, गिरीष शेट्टी, राकेश कोष्टी याच्याविरुद्ध दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचदिवशी पोलिसांनी अँड. वाघ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, सबळ पुरावा नसल्याने त्यांना अटक न करता सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

अटक करण्यास टाळाटाळ
शनिवारी सकाळी पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अँड. वाघ व मोरे यास अटक करून न्यायालयात केले. दरम्यान, मंगळवारी ही घटना झाली असली तरी केवळ राजकीय वरदहस्तामुळेच वाघ यांना अटक करण्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.