आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या उद्योगांत येतोय संडे सुटीचा ट्रेण्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातकाही वर्षांपूर्वी विजेचा तुटवडा होता, म्हणून महावितरण कंपनीने लोडशेडिंगसह उद्योगांसाठी लागू केलेल्या ‘स्टॅगरिंग डे’मुळे सातपूर आणि अंबड आद्योगिक वसाहतींत उद्योगांना शनिवारी नाइलाजाने साप्ताहिक सुटी घ्यावी लागत होती. मात्र, आता स्टॅगरिंग डेचा प्रभाव राहिलेला नसून, शनिवारीही सुरळीत वीजपुरवठा होत असल्याने अनेक कंपन्या शनिवारी सुरू राहतात, तर रविवारी सुटी घेत असल्याचा नवा ट्रेण्ड औद्यागिक वसाहतीत येऊ पाहत अाहे.
एका बाजूला व्यावसायिक जगतात जागतिक पातळीवर रविवारी साप्ताहिक सुटी असताना, नाशिकच्या उद्योगांना मात्र शनिवारी सुटी घ्यावी लागत होती. शनिवारची स्थानिक सुटी आणि रविवारची शासकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील सुटी यामुळे आठवड्यातील दोन दिवस वाया जात असल्याचे उद्योजकांनी सांिगतले. यामुळेच वीजपुरवठा सुरळीत होत असल्याने शनिवारी अनेक लहान, मध्यम युनिट सध्या सुरू असतात. हा ट्रेण्ड मोठ्या उद्योगात अद्याप आलेला नसला तरी लवकरच या संदर्भात उद्योजक संघटनांची एक बैठक हाेत असून, सर्वत्र रविवारची सुटी लागू करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

कामगारांनाही सुविधाजनक :उद्योजकच नाही तर कामगारांकरिताही रविवारची सुटी फायदेशीर ठरणार आहे. रविवारी मुलांच्या शाळांना सुटी असल्याने त्यांना कुटुंबासह वेळ घालविता येणे यामुळे शक्य होणार आहे.