आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Military Camp Area Only City Bus Permission

नाशिकात कडक सुरक्षा; लष्करी हद्दीतून फक्त शहर बसला परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- लष्कार हद्दीत छायाचित्रण केल्याच्या प्रकारामुळे लष्कर प्रशासनाने आता सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. लष्कर हद्दीतून आजूबाजूच्या गावात जाणार्‍या गावकर्‍याची वाहतूक बंद केली असून, शहर बससेवेला मात्र हिरवा कंदील दिला आहे.

दरम्यान, छायाचित्रण करणार्‍या संशयित शब्बीर हारुण शेख याचा तपासाची सूत्र उच्चस्तरीय यंत्रणेकडे आहेत. त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

साउथ एअरफोर्सच्या गेटमधून वाहतुकीस बंदी घालण्यात आली असून, शहर बससेवा सुरू ठेवताना प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासून चौकशी केली जात आहे. लहवित व साउथचे गावकरी वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर करत होते. निर्णयामुळे दहा मिनिटात गावात पोहचणार्‍या गावकर्‍यांना लहवित व साउथला जाण्यासाठी भगूर मार्गे ये-जा करताना अर्धा तास लागत आहे. तरीही गावकर्‍यांचा या निर्णयाचे स्वागत केले आहे.