नाशिक/ मालेगाव- मालेगाव तालुक्यातील गटाच्या सात जागांपैकी शिवसेनेला अवघ्या दाेन जागा मिळाल्याने शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री दादा भुसे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला अाहे. पंधरा वर्षांपूर्वी भुसे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून तालुक्यात सेनेला सातत्याने यश मिळाले.
पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या प्रभावी सत्तास्थाने शिवसेनेच्या अंमलाखाली राहिली. जि. प. गटांचा विचार करता सर्वाधिक जागा शिवसेनेलाच सातत्याने मिळाल्या अाहेत. सलग तिसऱ्यांदा भुसे स्वत: विधानसभा निवडणुकीत विजयी हाेत अाले अाहेत. त्यांनी केलेली कामे व पक्षाची वाटचाल लक्षात घेता त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले. मात्र, जि.प. निवडणुकीत सातपैकी अवघ्या दाेन जागा सेनेला मिळाल्याने या पराभवाची भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला अाहे.